9/11 हल्ल्याचे जगासमोर न आलेले फोटो

9/11 हल्ल्याचे जगासमोर न आलेले फोटो

हे सर्व फोटो अमेरिकेच्या लष्कराचं मुख्यालय पेंटॅगॉनवरच्या हल्ल्याचे आहेत.

  • Share this:

01 एप्रिल : अमेरिकेच्या एफबीआय या संस्थेनं 9/11च्या हल्ल्याचे याआधी कधीही न पाहिलेले फोटो प्रसिद्ध केले आहेत. हे सर्व फोटो अमेरिकेच्या लष्कराचं मुख्यालय पेंटॅगॉनवरच्या हल्ल्याचे आहेत.

भीषण हल्ल्याचे फोटो लगेच रिलीज न करण्याची अमेरिकेत पद्धत आहे. फोटो पाहून नागरिकांचं मनोबळ आणि मनस्थितीवर परिणाम होऊ नये, हे यामागचं कारण. याच कारणानं नऊ अकराचा हल्ला झाला, तेव्हा एकाही मृतदेहाचं चित्र किंवा फुटेज कुणाच्याही हाती लागलं नाही.      

जे गेले त्यांचं मरण दुर्दैवी होतं, पण जे जिवंत आहेत, त्यांच्या मनोबळाची काळजी घेणंही अमेरिकेच्या यंत्रणेला महत्त्वाचं वाटतं. दुसरं कारण असं की आपलं किती नुकसान झालंय, ते जगाला दाखवायचं कशाला, हा विचारही यामागे आहे..

First published: April 1, 2017, 2:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading