Home /News /videsh /

अंत्यसंस्काराला बापाच्या सिक्रेट गर्लफ्रेंडची एन्ट्री; लेक हादरलीच, मृतदेहासमोरच घडला धक्कादायक प्रकार!

अंत्यसंस्काराला बापाच्या सिक्रेट गर्लफ्रेंडची एन्ट्री; लेक हादरलीच, मृतदेहासमोरच घडला धक्कादायक प्रकार!

वडिलांच्या मृतदेहासमोर हा सर्व प्रकार उघड झाला.

    Weirdest Funeral: आपली माणसं जगातील जाण्याचं दु:ख कुठल्याही गोष्टीने मोठा असतो. अशा वेळी लोक एकमेकांना सांत्वन देतात आणि धैर्याने लढण्याचा सल्ला देतात. मात्र आयरलँडमध्ये एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारादरम्यान विचित्र परिस्थिती उद्भवली आणि लोक एकमेंकासोबत वाद घालू लागले. जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण... फोटोंमुळे सीक्रेट गर्लफ्रेंडचं गुढ उघड 'द मिरर'च्या वृत्तानुसार, आयरलँडच्या महिलेने आपली ओळख न सांगता वडिलांच्या अंत्यसंस्काराबाबत सांगितलं. महिलेने सांगितलं की, वडिलांच्या मृत्यूमुळे ती खूप दु:खी झाली होती. तिला वडिलांच्या कार्यालयात बोलावण्यात आलं होतं. कार्यालयात वडिलांच्या गोष्टी एकत्र करीत असताना तिला एक मोठा फोटो सापडला. त्या फोटोत महिलेचे वडील आपल्या गर्लफ्रेंडसोबत दिसत होते. फोटो फेकून कार्यालयातून पडली बाहेर... महिलेने जेव्हा कार्यालयातील लोकांना याबाबत विचारलं तर तेथील लोकही हैराण झाले. सहकाऱ्यांना वाटलं की, महिलेला तिच्या वडिलांच्या गर्लफ्रेंडबद्दल नक्कीच माहिती असेल. त्यावेळी ती खूप रागात होती. तिने फोटो फेकला आणि तावातावाने बाहेर निघून गेली. त्यानंतर वडिलांच्या गर्लफ्रेंडने महिलेले मेसेज आणि कॉल केला. त्यानंतर महिला अधिक संतापली. तिने त्या मेसेज वा कॉलला प्रत्युत्तरच दिलं नाही. हे ही वाचा-Spam Mail द्वारे पालटलं महिलेचं नशीब, जिंकली कोट्यवधींची लॉटरी अंत्यसंस्कारावेळी पोहोचली गर्लफ्रेंड इथपर्यंत सर्व ठीक होतं. मात्र वडिलांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांच्या गर्लफ्रेंडला पाहून महिला संतापली. गर्लफ्रेंड आपल्या कुटुंबासह तेथे पोहोचली होती. दुसरीडे महिला काहीही विचार न करता वडिलांच्या मृतदेहासमोर त्यांच्या गर्लफ्रेंडसोबत भांडू लागली. तिने गर्लफ्रेंडला तेथून हकलवून लावलं. महिलेने आरोप केला आहे की, वडिलांना त्यांच्या सीक्रेट गर्लफ्रेंडबद्दल कधी सांगितलं नाही. आता मात्र त्यांच्या निधनानंतर ती संपत्तीसाठी आली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Dead body, Girlfriend

    पुढील बातम्या