Home /News /videsh /

‘Cut, Copy, Paste’चे जनक लॅरी टेस्लर काळाच्या पडद्याआड

‘Cut, Copy, Paste’चे जनक लॅरी टेस्लर काळाच्या पडद्याआड

Cut, Copy आणि Paste चा शोध लावणारे लॅरी टेस्लर यांच निधन झालं आहे.

    न्यूयॉर्क, 21 फेब्रुवारी : संगणाकामुळे अनेक गोष्टी करणं सोप्या झाल्या आहेत. त्यातच संगणकामधील शॉर्टकट की मुळे त्या आणखीनच सोप्या झाल्या आहेत. या शॉर्टकट की मधील महत्वाच्या की म्हणजे Cut, Copy आणि Paste. याच Cut, Copy आणि Paste चा शोध लावणारे लॅरी टेस्लर यांच निधन झालं आहे. लॅरी यांना ‘Cut, Copy आणि Paste’चं जनक म्हणूनही ओळखलं जायचं. संपूर्ण जगाला या शॉर्टकट की ची ओळख त्यांनीच पहिल्यांदा करून दिली. वयाच्या 74व्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे. लॅरी टेस्लर हे संगणकीय वैज्ञानिक होते. त्यांचा जन्म न्यूयॉर्कमध्ये झाला. आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी कंप्युटर सायन्समध्ये पदवी मिळवली. 1973 मध्ये झेरॉक्स पालो अल्टो रिसर्च सेंटरमधून आपल्या करियरला सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी टीम मॉट यांच्यासोबत जिप्सी टेक्स्ट एडिटर तयार केला. या एडिटरमध्ये त्यांनी टेक्स्टला कॉपी आणि मूव करण्यासाठी प्रक्रिया तयार केली. टेस्लर यांच्या या शोधामुळे लोकांना पर्सनल कंप्युटर वापरणं फार सोयीस्कर बनलं. त्यांनी फाईंड , रिप्लेस, कट, कॉपी आणि पेस्ट अशा अनेक कमांड तयार केल्या. या कमांडमुळे टेक्स्ट लिहिण्यापासून सॉफ्टवेअर डेव्हलप तयार करण्यापर्यंत सर्व कामे सोपी होऊ लागली. 1983मध्ये या कमांडचा वापर अॅपलने त्यांच्या लिस कंप्युटरमधील (Lisa computer) सॉफ्टवेअरमध्ये केला. टेस्लर यांनी अॅपल, अॅमेझॉन आणि याहू अशा प्रसिद्ध कंपन्यांमध्येही काम केलं. टेस्लर यांनी 1960मध्ये सिलिकॉन व्हॅलीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी कंप्युटर काही लोकांपर्यंतच मर्यादीत होता. झेरॉक्स सोडल्यानंतर टेस्लर यांनी अॅपल कंपनी जॉईन केली. त्यांनी अॅपलमध्ये 17 वर्ष काम केलं. दैनिक भास्करे दिलेल्या वृत्तानुसार, 2011 साली टेस्लर यांनी कॅलिफोर्नियामध्ये एका कार्यक्रमादरम्यान म्हटलं होतं की, '27 डिसेंबर 1979चा दिवस मला अजूनही आठवत आहे. ज्यावेळी मला अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांना झेरॉक्सचा अल्टो कंप्युटर दाखवण्याची संधी मिळाली होती. त्यामध्ये आयकॉन, विंडे, फोल्डर आणि माझ्या कट, कॉपी आणि पेस्ट या कमांड होत्या.' 'मी स्टीव्ह यांना संपूर्ण प्रेजेंटशन दाखवलं तेव्हा ते खूप खूश झाले आणि म्हणाले की तुम्ही जग बदलू शकता. स्टीव्ह यांच्या वाक्यानंतर मी त्यांना तुम्हीच या कमांडचा वापर का करत नाही? असा सवाल केला. यानंतर लगेचच स्टीव्ह यांनी माझ्या या कमांड अॅपलमध्ये समाविष्ट करून घेतल्या.' लॅरी टेस्लर यांच्या या अविष्कारामुळे संपूर्ण जगाला संगणाकावर काम करणं खूप सोपं झालं. त्यामुळे असा संगणकीय वैज्ञानिक देशाने गमावल्याने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Computer

    पुढील बातम्या