News18 Lokmat

कुलभूषण जाधव यांना आज कुटुंबीय भेटणार

गुप्तहेर असल्याच्या संशयावरून कुलभूषण जाधव यांना अटक पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली होती.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Dec 25, 2017 11:47 AM IST

कुलभूषण जाधव यांना आज कुटुंबीय भेटणार

24 डिसेंबर:  पाकिस्तानच्या जेलमध्ये  शिक्षा भोगत असलेले नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव हे त्यांची पत्नी आणि आई  आज त्यांना भेटणार आहेत. गुप्तहेर असल्याच्या संशयावरून कुलभूषण जाधव यांना अटक पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली होती.

कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नी उद्या सकाळी इस्लामाबादला विमानाने जातील आणि संध्याकाळी पुन्हा भारतात परतील अशी माहिती पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मुहम्मद फैजल यांनी  ट्विट करून दिली आहे.

बलुचिस्तान प्रांतात गुप्तहेर आणि दहशतवादी हालचाली करण्यावरच्या आरोपावरून कुलभूषण जाधव यांना पाकिस्तान सरकारने अटक केली होती. तर त्यांचा या साऱ्याशी काही संबंध नसून ते इराणमध्ये व्यापार करत होते अशी भारताची भूमिका आहे . हा खटला आता आंतरराष्ट्रीय कोर्टात सुरू आहे.

कुलभूषण यादव यांना आपला पाठिंबा आहे, हे दर्शवणासाठी मुंबईत बाईक रॅली आणि मानवी साखळी तयार करण्यात आली होती. पाकिस्तानच्या जेलमध्ये असले तरीही कुलभुषण एकटे नाहीत, आम्ही त्याच्या पाठिशी आहोत, हा संदेश या रॅलितून देण्यात आला होता.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 24, 2017 06:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...