मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

व्यक्तीने दिली खोटी माहिती आणि बँकेकडून मिळाले 12 कोटी; आता आयुष्यात करतोय ऐश

व्यक्तीने दिली खोटी माहिती आणि बँकेकडून मिळाले 12 कोटी; आता आयुष्यात करतोय ऐश

आधी या पठ्ठ्याने एक लम्बोर्गिनी खरेदी केली, त्यानंतर एफ-350 रोलेक्सचं घड्याळ...

आधी या पठ्ठ्याने एक लम्बोर्गिनी खरेदी केली, त्यानंतर एफ-350 रोलेक्सचं घड्याळ...

आधी या पठ्ठ्याने एक लम्बोर्गिनी खरेदी केली, त्यानंतर एफ-350 रोलेक्सचं घड्याळ...

  • Published by:  Meenal Gangurde

वॉशिंग्टन, 30 नोव्हेंबर : अमेरिकेत (US News) एका व्यक्तीने कोरोना मदत कर्ज घेऊन खूप मजा-मस्ती केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात आरोपी तरुणाला 9 वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे. कोर्टात सांगितलेल्या माहितीनुसार, टेक्सासमधील एका व्यक्तीने फसवणूक (Fraud) करून 1.6 मिलियन डॉलर म्हणजे तब्बल 12 कोटी रुपयांचं कोरोना मदत कर्ज घेतलं आणि या पैशातून आधी लम्बॉर्गिनी कार खरेदी केली. (False information provided by a person and a fund of Rs 12 crore from a bank)

न्याय विभागाने सांगितलं की, 30 वर्षीय प्री प्राइस याला फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 110 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली. सप्टेंबर महिन्यात तो दोषी आढळून आला होता. ह्यूस्टरच्या प्राइसने पेचेक प्रोटेक्श प्रोग्राममधून 12 कोटी रुपयांचं लोन घेतलं होतं. ही योजना अमेरिकेतील सरकारने 2020 मध्ये कोरोना महासाथीत व्यावसायिकांच्या मदतीने गरजूंसाठी पारित केलं होतं.

हे ही वाचा-कॅफेचा विचित्र नियम! आईवडिलांना WELCOME पण मुलांना NO ENTRY

न्यायालयातील कागदपत्रांनुसार, ली प्राइसने सरकारकडून मिळालेल्या पैशातून आधी एक लम्बोर्गिनी खरेदी केली. एक फोर्ड एफ-350 रोलेक्सचं घड्याळ खरेदी केलं. अधिकाऱअयांनी सांगितलं की, आरोपीकडून 5.25 कोटीहून अधिक पैशांची वसूली करण्यात आली आहे.

अमेरिकेतील या योजनेअंतर्गत महासाथीत ज्यांना पैशांची गरज आहे असे मजूर वा गरजूंसाठी निधी उपलब्ध करून दिला जात होता. न्याय विभागाने सांगितल्यानुसार, कमीत कमी 120 लोकांवर या योजनेअंतर्गत फसवणुकीचा आरोप आहे.

First published:

Tags: America, Crime