मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

पाकिस्तानात वैमानिकांच्या बनावट परवान्यांचं गौडबंगाल, इमरान खान सरकारनं रद्द केले 50 वैमानिकांचे परवाने

पाकिस्तानात वैमानिकांच्या बनावट परवान्यांचं गौडबंगाल, इमरान खान सरकारनं रद्द केले 50 वैमानिकांचे परवाने

Pilot fake license: पाकिस्तानातील (pakistan) साधारणतः 40 टक्के पायलट (Pilot) मनमानी परवाने घेऊन विमान उड्डाण करत होते. याप्रकरणात आता इमरान खान सरकारनं (Imran Khan Government) कारवाई केली आहे. त्यांनी 50 वैमानिकांचे परवाने रद्दबातल ठरवले आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk
कराची, 20 डिसेंबर: कराची (Karachi) येथे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या (Pakistan international Airlines) विमानाला 22 मे रोजी एक भीषण अपघात (Accident) झाला होता. या अपघातानंतर पाकिस्तानातील बनावट परवाना (Pilot fake license) प्रकरण उघडकीस आलं. या दुर्दैवी घटनेत तब्बल 97 लोकांनी आपला जीव गमवला (Death) होता. यावेळी विमान वाहतूक मंत्री गुलाम सरवर खान (Gulam Sarvar Khan) यांनी माध्यमांना सांगितलं की, देशातील 860 सक्रिय पायलटांपैकी 260 जणांचे परवाने एकतर बनावट आहेत किंवा त्यांनी चुकीच्या मार्गाने हे परवाने मिळवले आहेत. यावरून पाकिस्तान सरकार लोकांच्या जीवाशी कशाप्रकारे खेळत होतं हे समोर आलं आहे. पाकिस्तानातील साधारणतः 40 टक्के पायलट मनमानी परवाने घेऊन विमान उड्डाण करत होते. याप्रकरणात आता इमरान खान सरकारनं कारवाई केली आहे. त्यांनी 50 वैमानिकांचे परवाने रद्दबातल ठरवले आहेत. त्याचबरोबर त्यांना हे परवाने कसे मिळाले याची चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. पाकिस्तान नागरी उड्डयन प्राधिकरणाने (CAA) आज ही माहिती न्यायालयाला दिली. यापूर्वीच युरोपीय संघातील (European Union) अनेक देशांनी पाकिस्तानी वैमानिकांवर बंदी घातली होती. तसेच पाकिस्तानातील बनावट परवाना प्रकरणाची कसून चौकशी करावी, अशी मागणीही युरोपीयन देशांनी केली होती. याच पार्श्वभूमीवर इमरान खान सरकारनं ही कारवाई केली आहे. तसेच पाकिस्तानच्या बाहेर काम करणाऱ्या इतर वैमानिकांच्या प्रतिमेला धक्का बसू नये, यामुळं संबंधित वैमानिकांची नावं जाहीर केली गेली नाहीत. डॉन वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, आंतरराष्ट्रीय नागरी उड्डयन संघटनेच्या मागणीनुसार पाकिस्तानातील तब्बल 860 व्यावसायिक वैमानिकांच्या परवान्यांची तपशीलवार चौकशी केली आहे. त्याचबरोबर व्यापक तपासणीनंतर यातील 50 वैमानिकांचे परवाने रद्दबातल ठरवले गेले आहेत.
First published:

पुढील बातम्या