नवी दिल्ली, 25 मार्च : कोरोनामुळे साऱ्या देशात हाहाकार माजला आहे. जगभरात 18 हजारहून अधिक लोकांचा कोरोनाने जीव घेतला आहे. त्यामुळं कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. असे असताना काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. यामध्ये बेल्जियममध्ये कोरोनाला रोखण्यासाठी लैगिंक संबंध ठेवण्यास मनाई करण्यात आल्याचा दावा केला आहे. मात्र या सगळ्या अफवा असल्याचे समोर आले आहे.
Worldnewsdailyreport.com या वेबसाईटने बेल्जियमच्या आरोग्यमंत्री मॅगी दे ब्लॉक यांनी घरात कोणतीही लैगिंक संबध ठेवू नये, असे आदेश दिले असल्याचे नमुद करण्यात आले होते. यात, बेल्जियम हा बीअर पिणारा आणि युरोपातील सेक्स कॅपिटल म्हणून ओळखला जातो, त्यामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे, असे सांगितले होते. यात आरोग्य मंत्र्यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र ही संपूर्ण बातमी फेक असल्याचे समोर आले आहे.
वाचा-Fact Check : इटलीच्या रस्त्यावर पडलाय मृतांचा खच? हे आहे व्हायरल फोटोमागचे सत्य
मॅगी दे ब्लॉक यांनी घरातील लैंगिक संबंधांवर बंदी घालण्याबाबत कोणतीही घोषणा केली नव्हती. याआधी त्यांनी 22 मार्च रोजी बेल्जियमध्ये लॉक डाऊन घोषित केले होते. बेल्जियममध्ये 4 हजार 269 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 122 लोकांचा मृत्यू झाला आहे.
वाचा-FACT CHECK: गोमूत्र प्यायल्यानं आणि लसूण खाल्ल्यानं कोरोना बरा होतो?
वर्ल्ड न्यूज डेली रिपोर्ट ही एक व्यंग्यात्मक आणि उपोरोधित बातम्या देणारी वेबसाईट आहे. या बातमीखाली, यात काही तथ्य नाही असेही लिहिण्यात आले होते. याआधी भारतीय वृत्तसंस्थांबाबत चुकीची माहिती दिली होती.
वाचा-Fact Check : खरंच कोरोना व्हायरस पृथ्वीवरून निघून जात आहे?जगातील 1 लाख लोकं झाली निरोगी
चीनच्या वुहानपासून सुरू झालेल्या विषाणूनचे जगातील तब्बल 175 देशांना विळखा घातला. प्रत्येक देश कोरोनापासून वाचण्यासाठी उपाययोजना करत आहे. यामुळं सध्या जवळजवळ संपर्ण जग लॉक डाऊन झाले आहे. जगभरात कोरोनामुळे 18 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 175 देशांमध्ये 4 लाख 22 हजार 829 हून अधिक रुग्णांची पुष्टी झाली आहे. मात्र असे असले तरी जगभरात जवळ जवळ 1 लाख 09 हजार 102 लोकं निरोगी झाले आहेत.
Published by:Priyanka Gawde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.