नवी दिल्ली 29 ऑक्टोबर: सोशल मीडियावर सध्या एका व्हिडीओने चांगलीच खळबळ उडाली आहे. पाकिस्तानच्या संसदेत बलुचिस्तानच्या खासदारांनी मोदी मोदीचे नारे लावले असं त्या व्हिडीओमध्ये म्हटलेलं आहे. भारतातल्या काही माध्यमांनी तो व्हिडीओ दाखवला आणि त्यात आणखी भर पडून तो व्हायरल झाला. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमुद कुरेशी भाषण करत असतानाचा तो व्हिडीओ आहे. त्यांचं भाषण सुरू असतानाच बलुचिस्तानचे खासदार नारे देत असताना त्यात दिसत आहे.. मात्र हे नारे हे मोदी मोदी असे नाहीत अशी माहितीही पुढे आली आहे.
पाकिस्तानातल्या बलुचिस्तानमध्ये स्वतंत्र बलुचिस्तानसाठी मोठी चळवळ गेली अनेक वर्ष सुरू आहे. तिथल्या नेत्यांना आणि लोकांना भारताबद्दल सहानुभूती आहे. तिथल्या चळवळीला भारताकडून खतपाणी घातलं जातं असा आरोप पाकिस्तान करत असते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात एकदा बलुचिस्तानचा उल्लेख केला होता. त्यामुळे या व्हिडीत दिले जाणारे नारे हे मोदी मोदी आहेत असं भासवण्याचा प्रयत्न केला गेल्याचा दावा करण्यात आलाय. भाजपच्या अनेक नेत्यांनीही तो व्हिडीओ ट्विट केला आहे.
With his dedication, determination & vision for Bharat, PM @narendramodi
Ji have inspired the whole world not just India!
See opposition of Pakistan parliament chanting "Modi Modi" against the ruling govt.
Massive embarassment for #ImranKhanpic.twitter.com/gbCOr6HCb1
— Shobha Karandlaje (@ShobhaBJP) October 29, 2020
हे खासदार मोदी मोदी नाही तर Voting, Voting अशा घोषणा देत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्या घोषणांना चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आल्याचा दावाही केला गेला. सोशल मीडियावर हे दोनही व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.
दुनिया न्यूजने पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या भाषणाचा पुर्ण व्हिडी दिला असून त्यात व्होटिंग, व्होटिंग अशा घोषणा खासदार देत असल्याचं म्हटलेलं आहे.