फेसबुकला ब्रिटनच्या माहिती नियंत्रकाचा दणका, ठोठावला 4.56 कोटीचा दंड

फेसबुकला ब्रिटनच्या माहिती नियंत्रकाचा दणका, ठोठावला 4.56 कोटीचा दंड

केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका डेटा चोरीप्रकरणी फेसबुकला चांगलाच दणका बसला आहे.

  • Share this:

मुंबई, 13 जुलै : केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका डेटा चोरीप्रकरणी फेसबुकला चांगलाच दणका बसला आहे. फेसबुकवर ब्रिटनच्या माहिती नियंत्रकाने 5 लाख पौंडांचा दंड ठोठावला आहे. वापरकर्त्यांचा डेटा गोपनीय राखण्यात फेसबुकला अपयश आल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे माहिती आयुक्त एलिझाबेथ डेनम यांनी सांगितली आहे.

फेसबुकला जवळपास सहा लाख 60 हजार डॉलर म्हणजे 4.56 कोटी रुपयांचा दंड ब्रिटनच्या माहिती नियंत्रकांकडून ठोठावण्यात आला आहे. या कारवाईनंतर इतर देश फेसबुकवर कोणती कारवाई करतात त्याकडे सर्वाचे लक्ष आहे. जवळपास 5 कोटी फेसबुक युजर्सचा डेटा त्यांच्या परवानगीविना वापरण्यात आल्याने फेसबुक आणि केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका ही राजकीय डेटा विश्लेषक कंपनी वादात सापडली होती. आणि त्यामुळे फेसबुकला एवढा मोठा फटका बसला आहे.

माझ्या कोहिनूरसाठी प्रार्थना करा, सायरा बानो यांचं भावनिक आवाहन

दरम्यान, फेसबुकचा सीईओ मार्क झकरबर्गने अमेरिकन काँग्रेससमोर साक्ष नोंदवली होती. लोकांच्या माहितीचं संरक्षण करण्यात आम्ही कमी पडलो, मी याची संपूर्ण जबाबदारी घेतो, अशी कबुली मार्कनं दिली होती.

कॅम्ब्रिज अॅनालिटिका या कंपनीनं अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत फेसबुकवरच्या डेटाच्या मदतीनं डोनाल्ड ट्रम्प यांना मदत केल्याचं समोर आलं होतं. अमेरिकेपासून सुरू झालेलं हे वादळ भारतापर्यंत येऊन पोहोचलं. केम्ब्रिज अॅनालिटिका या दोषी कंपनीचा डेटा काँग्रेसनं गुजरात निवडणुकीत वापरला असा आरोप भाजपकडून करण्यात आला होता.

हेही वाचा...

इम्रान खानचे भारतात 5 मुलं, समलैंगिक संबंधही ठेवले; पहिल्या पत्नीचा आरोप

VIDEO : लोकल थांबताच साप आला धावून

VIDEO...तर हवेतच झाली असती विमानांची टक्कर, बंगळुरूच्या आकाशातला थरार!

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 13, 2018 08:21 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading