• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • Facebook ची डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मोठी कारवाई, 2 वर्षांसाठी घातली बंदी

Facebook ची डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मोठी कारवाई, 2 वर्षांसाठी घातली बंदी

फेसबुकनं अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचं फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट दोन वर्षांसाठी सस्पेंड केलं (Facebook Suspends Donald Trump for Two Years)आहे.

 • Share this:
  न्यूयॉर्क 05 जून : फेसबुकनं अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचं फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट दोन वर्षांसाठी सस्पेंड केलं (Facebook Suspends Donald Trump for Two Years) आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर याआधी जानेवारी महिन्यात अनिश्चित कालावधीसाठी बंदी घातली होती. एकीकडे फेसबुकने ही कारवाई केली आहे, तर दुसरीकडे नायजेरियाने देशाच्या राष्ट्रपतींचे ट्विटर अकाउंट निलंबित केल्याबद्दल ट्विटरवरच बंदी घातली आहे. यावर्षी जानेवारीत अमेरिकेच्या कॅपिटलमध्ये झालेल्या दंगलीनंतर त्यांचे अकाउंट बंद झाले होते. ट्रम्प यांच्यावर हा दंगा भडकवण्याचा आरोप होता. पण गेल्या महिन्यात फेसबुकच्या मॉनिटरिंग बोर्डाची बैठक झाली होती आणि त्यात ट्रम्प यांच्या खात्यावर अनिश्चित काळासाठी घातलेल्या बंदीबाबत टीका झाली होती. कोरोना लस घेतलेल्या एकाही व्यक्तीचा मृत्यू नाही! एम्सच्या अभ्यासात काय आलं समोर? यूएस कॅपिटलमध्ये जानेवारीमध्ये झालेल्या दंग्याबाबत फेसबुकनं म्हटलं होतं, की ट्रम्प यांच्या कृत्यामुळे नियमांचं गंभीर उल्लंघन झालं होतं. फेसबुक आपलं ते धोरणही बंद करणार आहे ज्याअंतर्गत राजकारण्यांना आशयाच्या निरीक्षणातून सूट देण्यात आली होती. आता ही सूट मिळणार नाही. फेसबुकने म्हटले आहे, की आता नेत्यांच्या पोस्टलादेखील कोणतंही सुरक्षा कवच मिळणार नाही. 7 जानेवारीपासून ट्रम्पवरील या बंदीला सुरुवात होईल आणि 7 जानेवारी 2023 पर्यंत ती कायम राहील एकीकडे फेसबुकनं ट्रम्प यांचं अकाऊंट बॅन केलं आहे, तर दुसरीकडे नायजेरियानं ट्विटरवर मोठी कारवाई केली आहे. या देशात ट्विटर अनिश्चित कालावधीसाठी सस्पेंड केलं गेलं आहे. नायजेरियाचं म्हणणं आहे, की या प्लॅफॉर्मचा उपयोग देशातील कॉरपोरेटला अपमानित करण्यासाठी केला जात आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने म्हटले आहे, की फेडरल सरकारने ट्विटर अनिश्चित काळासाठी निलंबित केले आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: