S M L

Facebook वरचा तुमचा डेटा चोरीला जातोय, न्यूयॉर्क टाइम्स चा खळबळजनक खुलासा

या प्रकरणांमुळे फेसबुकच्या विश्वसनियतेला धक्का लागला आहे. बडी जाहीरातदार कंपनी असलेल्या युनिलिव्हरने फेसबुकला जाहीराती बंद करण्याचा इशाराही दिला होता.

News18 Lokmat | Updated On: Dec 19, 2018 09:23 PM IST

Facebook वरचा तुमचा डेटा चोरीला जातोय, न्यूयॉर्क टाइम्स चा खळबळजनक खुलासा

न्यूयॉर्क,19 डिसेंबर : फेसबुक डेटा लीक प्रकरणी आणखी एक खळबळजनक खुलासा झाला आहे. फेसबुकने अनेक बड्या कंपन्यांना डेटा विकल्याचा खुलासा न्यूयॉर्क टाइम्सने केला आहे. या आधी असा प्रकार घडल्याचं फेसबुकने मान्य केलं होतं. पण आधीच्या पेक्षा कितीतरी जास्त डेटा विकल्याचं टाइम्स ने म्हटलं आहे. या नव्या खुलाश्यामुळे फेबुकची विश्वसनियता पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.


'न्यूयॉर्क टाइम्स'च्या वृत्तानुसार फेसबुक फक्त डेटाच नाही तर लोकांचे मोबाईल नंबरही विकत असल्याचं म्हटलं आहे. Apple, Amazon, Microsoft, Netflix आणि Spotify या बड्या कंपन्यांना फेसबुकने हा डेटा विकल्याचा आरोप होतोय. एवढच नाही तर Netflix ला लोकांचे खासगी मेसेज वाचण्याचे अधिकारही फेसबुकने दिले होते असंही 'न्यूयॉर्क टाइम्स'ने आपल्या बातमीत म्हटलं आहे.फेसबुकवर जगभरातले कोट्यवधी लोक सदस्य आहेत. या आधीही 2012 मध्ये केंब्रिज एनालिटिका या कंपनीला फेसबुकने डेटा विकल्याचा आरोप झाला होता. त्याच बरोबर 2016 च्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही या डेटाचा वापर झाल्याचं उघड झालं होतं. सध्या त्या प्रकरणाची चौकशीही सुरू आहे.


Loading...

या प्रकरणांमुळे फेसबुकच्या विश्वसनियतेला धक्का लागला आहे. त्यामुळे फेसबुकची बडी जाहीरातदार कंपनी असलेल्या युनिलिव्हरने फेसबुकला जाहीराती बंद करण्याचा इशाराही काही महिन्यांपूर्वी दिला होता. आम्ही बेजबाबदार प्लॅटफॉर्म्सवर जाहीराती देत नाही असं युनिलिव्हरने म्हटलं होतं.


 


 

VIDEO : शेतकऱ्यानं हात जोडून केली राज ठाकरेंना विनंती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 19, 2018 09:23 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close