S M L

अमेरिकन काँग्रेसपुढे बसलेल्या मार्क झकरबर्गच्या खुर्चीवरची उशी चर्चेत

फेसबुकचा मालक मार्क झकरबर्गला अमेरिकन काँग्रेससमोर पाच तास प्रश्नांना उत्तरं द्यावी लागली. या विशेष समितीमधल्या 44 जणांच्या तिखट प्रश्नांना झकरबर्गला उत्तरं द्यावी लागली.

Sonali Deshpande | Updated On: Apr 11, 2018 03:44 PM IST

अमेरिकन काँग्रेसपुढे बसलेल्या मार्क झकरबर्गच्या खुर्चीवरची उशी चर्चेत

11 एप्रिल : फेसबुकचा मालक मार्क झकरबर्गला अमेरिकन काँग्रेससमोर पाच तास प्रश्नांना उत्तरं द्यावी लागली. या विशेष समितीमधल्या 44 जणांच्या तिखट प्रश्नांना झकरबर्गला उत्तरं द्यावी लागली. पण चर्चा होती ती झकरबर्गच्या खुर्चीवर ठेवलेल्या उशीची. तिचा फोटोही व्हायरल झाला.

ही उशी  4 ते 5 इंच होती. अब्जोपती मार्क झकरबर्गच्या खुर्चीवर ही उशी का बरं ठेवली असेल? झकरबर्गची उंची आहे 5 फुट 7 इंच. अमेरिकन काँग्रेस प्रतिनिधींसमोर बोलताना आय काॅन्टॅक्ट नीट व्हावा यासाठी ही उशी ठेवली होती. त्या उशीवर बसल्यानं झकरबर्गला खूप आरामदायी वाटलं. अर्थात, हे बसण्यापुरतं. प्रश्नांची उत्तरं देता देता मात्र त्याच्या नाकीनऊ आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 11, 2018 03:44 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close