Home /News /videsh /

अमेरिकी कायद्यानुसार तालिबान दहशतवादीच! Facebook कडून तालिबानी कंटेंटवर बंदी

अमेरिकी कायद्यानुसार तालिबान दहशतवादीच! Facebook कडून तालिबानी कंटेंटवर बंदी

फेसबुकनं (Facebook) तालिबान संघटनेच्या कंटेंटवर बंदी घातली असून अमेरिकी कायद्यानुसार (US law) तालिबान ही दहशतवादी संघटना असल्याचं म्हटलं आहे.

    न्यूयॉर्क, 17 ऑगस्ट : अमेरिकेच्या कायद्यातील (American law) तरतुदींनुसार तालिबान (Taliban) ही एक दहशतवादी संघटना (Terror Organization) असल्याचं सिद्ध होत असून या संघटनेच्या कुठल्याही कंटेंटला (Talibani Content) आपल्या प्लॅटफॉर्मवर स्थान नसल्याचं फेसबुकनं (Facebook) जाहीर केलं आहे. त्यामुळे तालिबानी नेत्यांची फेसबुक असणारी अकाऊंट्स ब्लॉक होणार असून दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या कुठल्याही विचारांना थारा मिळणार नसल्याचं फेसबुकनं म्हटलं आहे. काय आहे अमेरिकेचा कायदा? अमेरिकेनं जाहीर केलेल्या दहशतवादी संघटनांच्या यादीत तालिबानचा समावेश नाही. अल् कायदा, आयसीस यासारख्या संघटनांच्या यादीत अमेरिकेनं तालिबानचा समावेश केलेला नाही. मात्र दहशतवादी संघटना कुणाला म्हणायचं, याची तरतूद अमेरिकेच्या कायद्यात करण्यात आली आहे. त्यात व्यक्तीने किंवा गटाने केलेले गुन्हेगारी किंवा हिंसक कृत्य असा उल्लेख आहे. त्यानुसार तालिबान ही संघटना दहशतवादी ठरत असल्याचा दावा फेसबुकनं केला आहे. अशी उचलली पावलं दहशतवादाचं समर्थन करणारे कुठलेही तपशील फेसबुकवरून प्रसारित करण्यात येऊ नयेत, यासाठी फेसबुकनं खबरदारी घेतली आहे. त्याचप्रमाणं दारी आणि पश्तो भाषा अवगत असणारे अफगाणिस्तानमधील काही तज्ज्ञही फेसबुकनं नियुक्त केले आहेत. या भाषांमध्ये जर काही तपशील फेसबुकवर टाकण्यात आले, तर ते ओळखून तातडीने काढून टाकण्यात येणार आहेत. इंग्रजी व्यतिरिक्त इतर कुठल्याही स्थानिक भाषेतून दहशतवादी विचार पसरवण्याचं काम केलं जाऊ शकतं. त्यासाठी तालिबानशी संबंधित सर्व स्थानिक भाषांमधील तज्ज्ञ नियुक्त केले जाणार आहेत. हे वाचा - Explainer: अफगाणिस्तानातील 'तालिबान राज'नंतर भारतातही दहशतवाद फोफावणार, काय होणार नेमका परिणाम? अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं राज्य अमेरिकेनं सैन्य माघारीचा निर्णय घेतल्यानंतर तालिबान आक्रमक झालं असून अफगाणिस्तानमधील बहुतांश भूभाग त्यांनी काबीज केला होता. गेल्या काही दिवसांत तालिबाननं आपला मोर्चा काबूलकडे वळवला आणि राजधानीदेखील त्यांनी काबीज केली आहे. त्यामुळे तालिबानमध्ये हिंसाचार वाढला असून विविध देशातील नागरिक देश सोडून जाण्यासाठी विमानात गर्दी करत असल्याचं चित्र आहे. तालिबाननं मात्र आता शांततेची भाषा सुरु केली असून परदेशी नागरिकांनी घाबरून न जाण्याचं आवाहन केलं आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Facebook, Taliban

    पुढील बातम्या