Home /News /videsh /

चीनमधील MEETOO Movement चा चेहरा असणाऱ्या महिलेचा कोर्टात पराभव, दिली हताश प्रतिक्रिया

चीनमधील MEETOO Movement चा चेहरा असणाऱ्या महिलेचा कोर्टात पराभव, दिली हताश प्रतिक्रिया

चीनमधील MEETOO Movement चा चेहरा (Face) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झाउ शियाओशुआन (Zhou Xiaoxuan) हिचा न्यायालयात (Court) पराभव झाला आहे.

    बिजिंग, 15 सप्टेंबर : चीनमधील MEETOO Movement चा चेहरा (Face) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झाउ शियाओशुआन (Zhou Xiaoxuan) हिचा न्यायालयात (Court) पराभव झाला आहे. प्रसिद्धी टीव्ही अँकर झू जून (Zhu Jun) याला या प्रकरणात कोर्टानं पुराव्याअभावी क्लीनचिट दिली आहे. काय होतं प्रकरण? चीनमधील सीसीटीव्ही न्यूजचा अंकर झू जूननं जबरदस्तीनं आपलं चुंबन घेण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या शरीराला आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप झाऊ शियाओशुआननं केला होता. 2014 साली हा प्रकार घडला होता आणि झाऊ त्यावेळी 21 वर्षांची होती. चॅनलमध्ये इंटर्नशिप करताना तिच्यासोबत घडलेल्या या प्रकाराला तिने वाचा फोडली होती. त्यानंतर चीनमधील अनेक महिलांनी आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांना वाचा फोडली होती. त्यामुळे झाऊला चीनमधील मीटू मूव्हमेंटचा चेहरा म्हणून ओळखलं जात होतं. कोर्टात काय घडलं चीनमधील कोर्टात अनेक दिवस या प्रकरणाची सुनावणी चालली. एक हाय प्रोफाईल प्रकरण म्हणून या खटल्याकडे पाहिलं गेलं. मात्र अखेर झू जूनविरोधात कुठलाही ठोस पुरावा न मिळाल्यामुळे कोर्टानं त्याला निर्दोष ठरवलं. पुराव्याअभावी त्याची मुक्तता करण्याचा निर्णय कोर्टाने दिला. आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करत झाऊ हिने झूला कडक शिक्षा ठोठावण्याची मागणी कोर्टात केली होती. 50 हजार युआनचा दंडदेखील झूकडून आकारण्यात यावा, अशी मागणी तिने केली होती. मात्र तिने केलेल्या आरोपाचे कुठलेही पुरावे ती सादर करू शकली नाही. त्यामुळे पुराव्याअभावी कोर्टानें झू जूनला निर्दोष मुक्त करण्याचा फैसला सुनावला. हे वाचा - या बेटावर आहेत फक्त प्रेतं आणि कवट्या, जिवंत माणसांना NO ENTRY; पाहा PHOTOs या निकालानंतर कोर्टाबाहेर पडलेली झाऊ कमालीची नाराज दिसली. तिच्यावर आता झू जूनने अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. आपली ताकद आता संपली असून यापुढे लढण्यासाठी आपल्याकडे ऊर्जाच उरली नसल्याची हताश प्रतिक्रिया झाऊनं दिली आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: China, Court, Sexual harassment

    पुढील बातम्या