Home /News /videsh /

...तो रहस्यमय आजार, अमेरिकेच्या राजदुतांना ऐकायला यायचे विचित्र आवाज

...तो रहस्यमय आजार, अमेरिकेच्या राजदुतांना ऐकायला यायचे विचित्र आवाज

चार वर्षानंतर त्या रहस्यमयी आजाराची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. ज्यामध्ये क्युबाची राजधानी हवानामध्ये तैनात असलेल्या राजदुतांना विचित्र आवज ऐकायला यायचे. मुख्य म्हणजे हा आजार फक्त राजदूत आणि त्यांच्या कुटुंबालाच त्रास द्यायचा.

मुंबई, 11 डिसेंबर : चार वर्षानंतर त्या रहस्यमयी आजाराची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. ज्यामध्ये क्युबाची राजधानी हवानामध्ये तैनात असलेल्या राजदुतांना विचित्र आवज ऐकायला यायचे. मुख्य म्हणजे हा आजार फक्त राजदूत आणि त्यांच्या कुटुंबालाच त्रास द्यायचा. या आजाराला हवाना सिंड्रोम म्हणून संबोधलं गेलं. आता याबाबत एक नवा रिपोर्ट समोर आला आहे, ज्यामध्ये अनेक गुपित उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 2016 मध्ये हवानामधील अमेरिकेच्या (America) राजदुतांनी विचित्र आवाज ऐकू येत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर या आजाराचा झपाट्याने प्रसार झाला. राजदुतांव्यतरिक्त क्युबा, चीन (China) तसेच अन्य देशांमध्ये कार्यरत असलेल्या अमेरिकन गुप्तचर विभागातील लोक देखील या आजाराने ग्रस्त झाले होते. या आजाराने ग्रस्त लोकांना पुर्वी कधीही न ऐकलेला आवाज सातत्याने ऐकू येत होता. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत बदल झाल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर त्यांना डोकेदुखी, उलटीचा त्रास जाणवू लागला. त्यांच्या बोलणं आणि ऐकण्याची क्षमता कमी झाल्याचं दिसून आले. याचाच अर्थ या आजाराचा थेट परिणाम मज्जासंस्थेवर (Nervous System) झाला. पण, केवळ राजदूत आणि गुप्तहेर लक्ष्य ठरलेल्या, या आजाराबाबत अधिक पडताळणी केली असता, त्याचे निश्चित कारण समोर येऊ शकले नाही. मात्र त्यानंतर या आजाराबाबत सातत्याने संशोधन सुरु आहे. नॅशनल अकॅडॅमिक्स ऑफ सायन्सेस (NAS) च्या नव्या अहवालात या आजाराबाबत खुलासा झाला आहे. या अहवालानुसार ही मायक्रोव्हेव्ह रेडीएशन (Microwave Radiation) होती. अमेरिकन अधिकारी आजारी पडावेत यासाठी हे रेडिएशन सोडले गेल्याची शक्यता आहे. रशियाने (Russia) मायक्रोव्हेह रेडीएशनवर मोठ्या प्रमाणावर प्रयोग केले आहेत. त्यामुळे संशयाची सुई साहजिकच रशियाकडे जाते. मात्र आम्ही असा कोणताही हल्ला केलेला नाही, असे स्पष्टीकरण रशियाने या संदर्भात दिले आहे. मायक्रोव्हेह हत्यार म्हणजे काय? मायक्रोव्हेह शस्र (weapon) हे थेट ऊर्जा शस्र (Direct energy weapon) आहे. जे विकिरण, लेझर, सॉनिक किंवा मायक्रोव्हेह स्वरुपात असते. त्यातील तीव्र विकिरणांमुळे कानामध्ये विचित्र आवाज ऐकू येतात. हे आवाज ऐकताच असे वाटते की ज्यामुळे डोक्यात काही विशिष्ट क्रिया होताहेत असे वाटते. या विकिरणांचा परिणाम अत्यंत धोकादायक आणि दीर्घकाळ टिकणारा असतो. यामुळे ऐकणे आणि समजण्याची क्षमता कमी होते. तसेच मोठ्या प्रमाणावर शारीरिक बदल होतात. 2016 मध्ये अमेरिकन अधिकाऱ्यांसोबत असे प्रकार घडल्याचे स्पष्ट होताच, अमेरिकेने क्युबासोबत (Cuba) चर्चा केली होती. त्यावेळी असा कोणत्याही प्रकारचा हल्ला झाला नसल्याचे क्युबाने स्पष्ट केले होते. त्यावेळी क्युबा (Cuba) आणि चीनमध्ये (China) मोठ्या प्रमाणावर अमेरिकन राजदूत आणि त्यांचे कुटुंबीय वास्तव्यास होते. या लोकांसोबत अशी घटना घडून येत असल्याचं समोर आलं होतं. त्यातील काही लोकांना अन्यत्र हलवले असता, त्यांना होणारा त्रास कमी झाल्याचे दिसून आले. मात्र त्यातील काही लोकांची स्थिती इतकी बिघडली की त्यांना स्वतःची दैनंदिन कामे करण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहवे लागले. क्यूबा (Cuba), रशिया (Russia) किंवा अन्य शत्रू राष्ट्रांनी केलेला हा सॉनिक हल्ला आहे, असे मानून एनएएसने याबाबत शोधकार्य सुरु केले होते. आता याबाबत जो अभ्यास केला गेला, त्या अभ्यास पथकात 19 संशोधक आणि विज्ञान क्षेत्रातील व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. हा काय आजार आहे, याचे संशोधन करण्यासाठी या पथकाने 40 अधिकाऱ्यांची तपासणी केली. हे विकिरणाचे दुष्परिणाम आहेत, असे या संशोधनातून स्पष्ट झाले. जिथे हे अधिकारी राहतात, त्या जागेवर किंवा खोलीवर हे विकिरण हल्ला करीत असल्याचे यातून समोर आले. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, जर हा हल्ला असेल तर तो संपुष्टात आलेला नाही. अशा प्रकारची घटना पुन्हा घडू शकते, अशी शक्यता या संशोधकांनी वर्तवली आहे. या हल्ल्याचा मुख्य स्रोत अजूनही स्पष्ट झालेला नाही. त्यामुळे परदेशात कार्यरत असलेल्या अमेरिकी अधिकाऱ्यांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. भविष्यात अशी घटना पुन्हा घडल्यास ती अधिक गंभीर असू शकते आणि ती भयावह परिणाम करु शकेल. ही स्थिती पाहता अमेरिकेचा गुप्तचर विभाग सतर्क झाला आहे. अन्य देशाने अमेरिकेवर अशा प्रकारे हल्ला तर केला नाही ना, याबाबत हा विभाग तपास करीत आहे. तसेच आजारी पडलेल्या तसंच अजूनही ज्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकली नाही, अशा अमेरिकन राजदुतांसाठी आता केअर बेनिफिट बिल आणले जाण्याची शक्यता आहे. परदेशात तैनात असलेल्या सैनिकांना याचा विशेष लाभ मिळू शकतो.
First published:

पुढील बातम्या