Home /News /videsh /

चीनमध्ये पसरला इन्फ्लूएंझा अन् कोरोनाचा दुहेरी धोका, तज्ज्ञांनी दिला इशारा

चीनमध्ये पसरला इन्फ्लूएंझा अन् कोरोनाचा दुहेरी धोका, तज्ज्ञांनी दिला इशारा

प्रतिबंधात्मक उपायांमुळे कमकुवत झालेली सामूहिक प्रतिकारशक्ती इन्फ्लूएंझा आजार वाढण्यासाठी जबाबदार असू शकते.

    बीजिंग, 28 जून : दक्षिण चीनमध्ये (South China) साथीचा आजाराच्या उद्रेकामुळे औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा (Medicine Shortage in China) निर्माण झाला आहे. त्यानंतर डॉक्टरांनी इन्फ्लूएंझा (Influenza) आणि कोरोना (Corona) , या दोन्ही आजाराबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. एक सरकारी माध्यम अहवालात, सोमवारी ही माहिती देण्यात आली. तज्ज्ञांनी सांगितले की... ग्लोबल टाइम्सने दिलेल्या अहवालानुसार तज्ज्ञांनी सांगितले की, सतत कोरोनावरील प्रतिबंधात्मक उपायांमुळे कमकुवत झालेली सामूहिक प्रतिकारशक्ती इन्फ्लूएंझा आजार वाढण्यासाठी जबाबदार असू शकते. इन्फ्लूएंझा ग्रस्त लोकांची संख्या हिवाळ्याच्या तुलनेत खूप जास्त आहे. जेव्हा संक्रमण अधिक वेगाने पसरते तेव्हा अशी परिस्थिती उद्भवते. हे चिंताजनक आहे, असे डॉक्टर आणि तज्ञ म्हणाले आहेत. ग्लोबल टाइम्सच्या अहवालानुसार, चायनीज नॅशनल इन्फ्लुएंझा सेंटर (CNIC) च्या ताज्या अहवालात असे म्हटले आहे की, 4 एप्रिलपासून 19 जूनच्या दरम्यान 17 प्रांतांमध्ये इन्फ्लूएंजाचे 507 प्रकरण समोर आली आहे. त्यात 503 दक्षिण चीनमध्ये आहेत. 2021च्या 136 प्रकरणांच्या तुलनेत आताची संख्या खूप जास्त आहे. फ्लूच्या बळींची संख्या 10 किंवा त्याहून अधिक पोहोचते तेव्हा इन्फ्लूएंझाचा उद्रेक झाला आहे, असे म्हटले जाते. चीनचे 3 क्षेत्र सर्वाधिक प्रभावित - "मोठ्या मागणीमुळे, दक्षिण चीनमधील अनेक फार्मसीमध्ये ऑसेल्टामिव्हिर सारखी इन्फ्लूएंझासाठी अँटीव्हायरल औषधे कमी प्रमाणात उपलब्ध आहेत," असे समाचार अहवालात म्हटले आहे. म्हटले आहे. तर सीएनआयसीच्या अहवालात असे म्हटले गेले आहे की, दक्षिणी चीनमधील ग्वांगडोंग (119) आणि गुआंग्शी ज़ुआंग (79) तसेच पूर्वी चीनमधील फ़ुज़ियान (109) प्रांत मोठ्या प्रमाणात इन्फ्लूएंजा आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळली आहे. हेही वाचा - 37 व्या वयात 350 किलो वजन; अवयवांनी काम करणं बंद केलं आणि झाला मृत्यू शेनझेन रुग्णालयाचे प्रमुख लू होंगझोउ यांनी ग्लोबल टाईम्ससोबत बोलताना सांगितले की, मुसळधार पाऊस, कमी तापमान आणि कोरोनाविरोधीतील नियंत्रण उपायांमुळे लोकांमध्ये श्वसन रोगांचा धोका कमी झाला आहे. अहवालात असे म्हटले आहे की, इन्फ्लूएंझा ए (H3N2) उपप्रकाराची सर्वाधिक प्रकरणे दक्षिण चीनमध्ये आढळून आली आहेत. याचा संक्रमण दर जास्त आहे. तर मृत्यू दर 0.2% इतका आहे, अशी माहितीही शेनझेन रुग्णालयाचे प्रमुख लू होंगझोउ यांनी दिली.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: China, Corona updates, Coronavirus

    पुढील बातम्या