VIDEO हे वंदे मातरम् ऐकून अंगावर उठेल रोमांच! स्वातंत्र्यदिनाच्या इंग्रजांनी दिल्या अनोख्या शुभेच्छा!

VIDEO हे वंदे मातरम् ऐकून अंगावर उठेल रोमांच! स्वातंत्र्यदिनाच्या इंग्रजांनी दिल्या अनोख्या शुभेच्छा!

काही मिनिटांत हा VIDEO सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे

  • Share this:

मुंबई, 15 ऑगस्ट : आज देशभरात मोठ्या आनंदात 74 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. कोरोनाचा धोका असतानाही योग्य ती काळजी घेत नागरिकांनी झेंड्याला वंदन केलं. अशातच Brut ने एका अनोख्या शैलीत भारताच्या स्वातंत्र्यदिनी शुभेच्छा दिल्या. त्यांनी वंदे मातरत ही गीत अनोख्या पद्धतीने सादर केले.

Uk च्या Abbey Road Studio मध्ये रेकॉर्ड केलेल्या या गीताला मोठी पसंती मिळत आहे. साधारण 75 वाद्यांच्या रॉयल फिलहारमोनिक ऑर्केस्ट्राने हे गीत सादर केलं आहे. सोशल मीडियावर याची मोठी चर्चा सुरू आहे. इला पलीवाल यांनी हे गाणं गायलं आहे. हे गीत ऐकून अंगावर रोमांच उभं राहिलं. देशावर राज्य करणाऱ्या इंग्रजांच्या तोंडून वंदे मातरम ऐकताना आनंद होत असल्याच्या प्रतिक्रिया अनेक प्रेक्षकांनी व्यक्त केल्या आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सातव्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधन करताना लहान मुलांची आठवण काढली. कोरोनामुळे यंदा लहान मुलांना लाल किल्ल्यावरील कार्यक्रमात सहभागी होता आलं नाही. यंदाचा स्वतंत्र्य दिन हा कोरोना वॉरियर्स सोबत साजरा केला जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

-आत्मनिर्भर भारत बनणं गरजेचं आहे. आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण होणार, आत्मनिर्भर भारत हा देशाचा मंत्र, प्रगतीची उर्जा आत्मविश्वासानं मिळते

-काही महिन्यांत N-95 मास्क, PPE किट, वेंटिलेटर विदेशातून आयात करावे लागत होते. मात्र आज भारतात याचं उत्पादन सुरू करण्यात आलं. भारत केवळ स्वत:ची गरज पूर्ण करत नाही तर इतर देशांना मदतीचा हात देत आहे.

- कमी वेळात नवीन सायबर सुरक्षा निती येणार आहे. याशिवाय सायबर सुरक्षेसाठी एक रणनिती आखण्यात येणार आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: August 15, 2020, 10:26 PM IST

ताज्या बातम्या