जुळ्या बहिणींनी जुळ्या मुलांसोबत केला विवाह, त्यांच्या बाळाबाबत का होतीये देशभर चर्चा?

जुळ्या बहिणींनी जुळ्या मुलांसोबत केला विवाह, त्यांच्या बाळाबाबत का होतीये देशभर चर्चा?

जुळ्या (Twins) बहिणी ब्रिटनी आणि ब्रिआना डीएन यांनी ऑगस्ट 2018 मध्ये जोश आणि जेरेमी सेलीयर्स या जुळ्या भावांशी लग्न (Marriage) केलं होतं. ही जुळी जोडपी अमेरिकेत एखाद्या सेलिब्रिटीसारखी प्रसिद्ध आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली 01 मार्च : हुबेहूब एकमेकांसारख्या दिसणाऱ्या जुळ्या लोकांबद्दल (Twins) सर्वांनाच खूप कुतूहल असतं. सर्वच जुळी मुलं दिसायला एकसारखी असतात असं नाही. अगदी हुबेहूब एकमेकांसारख्या दिसणाऱ्या जुळ्या लोकांना आयडेन्टीकल ट्विन्स (Identical Twins) म्हणतात. अमेरिकेत (USA) सध्या दोन जुळ्या जोडप्यांची जोरदार चर्चा आहे. दोन जुळ्या बहिणींनी दोन जुळ्या भावांशी लग्न केलं असून त्या दोघी बहिणी गरोदर होत्या. त्यापैकी एका जोडप्याला नुकताच मुलगा झाला असून दुसरं जोडपंही लवकरच त्यांच्या बाळाच्या आगमनाची बातमी देईल, अशी अपेक्षा आहे. ही मुलंही दिसायला एकमेकांसारखीच असतील का याबाबत सगळ्यांना उत्सुकता आहे.

अमेरिकेतील जुळ्या बहिणी ब्रिटनी आणि ब्रिआना डीएन यांनी ऑगस्ट 2018 मध्ये जोश आणि जेरेमी सेलीयर्स या जुळ्या भावांशी ओहायो इथल्या ट्विन्सबर्गमध्ये (Twinsburg) ट्वीन्स डेज फेस्टीव्हलमध्ये (Twins Days Festival) लग्न केलं होतं. ही जुळी जोडपी अमेरिकेत एखाद्या सेलिब्रिटीसारखी प्रसिद्ध आहेत. ऑनलाइन तसंच त्यांच्या राहण्याच्या ठिकाणीही त्यांना एखाद्या सेलिब्रिटीसारखी वागणूक मिळते.

टीएलसी डॉक्युमेंट्रीवरील (TLC Documentary) ट्वीनसेन वेडिंग (Twin sane Wedding) कार्यक्रमात या दोन्ही जुळ्या जोडप्यांनी या दोघी बहिणी एकाचवेळी गरोदर होतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं होतं. आपल्यालाही जुळी मुलं व्हावीत तसंच दोन्ही जोडप्यांना एकाच वेळी मुलं व्हावीत अशी त्यांची अपेक्षा होती.यामुळं आम्ही सगळेजण एकाच पेजवर झळकत राहू, असं जेरेमीनं टीएलसी डॉक्युमेंट्रीमध्ये सांगितलं होतं.

गेल्या वर्षी 14 ऑगस्ट 2020 रोजी या जोडप्यांनी आपल्या @ सेलीयर्स ट्विन्स या इन्स्टाग्राम अकाउंटवर या दोघी बहिणी गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. या दोघी गरोदर असून, आमची मुलं फक्त चुलत भावंड नसतील तर जेनेटिकलीही भावंड असतील, अतिशय आनंददायी आणि रोमांचक असा हा अनुभव आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली होती.

दरम्यान, ब्रिटनी आणि जोश यांना जानेवारीत मुलगा झाला. इन्स्टाग्रामवरून जोश यानं ही आनंदाची बातमी दिली. ब्रिटनीनं एका मुलाला जन्म दिला असून, बाळ अगदी निरोगी आणि उत्तम आहे. जेट सेलीयर्स (Jett Salyers) याचं स्वागत आहे. ब्रिटनीची तब्बेतही उत्तम आहे. जेटचा पिता झाल्याबद्दल मला खूप अभिमान आणि आनंद वाटत आहे, अशा शब्दात जोश यानं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यानं ब्रिटनी आणि बाळाचे फोटोही शेअर केले आहेत. दरम्यान, ब्रिआनाचे शेवटचे तीन महिने अद्याप पूर्ण व्हायचे असून लवकरच तेही आनंदाची बातमी देतील. ब्रिआनाचा बेबी बंप दिसत असलेला फोटोही त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या जुळ्या जोडप्याच्या आनंदात नेटीझन्सही सहभागी झाले असून, त्यांनीही या जोडप्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

Published by: Kiran Pharate
First published: April 1, 2021, 4:22 PM IST

ताज्या बातम्या