लंडन, 07 जानेवारी : तुम्ही लहान असताना तुमच्या भावंडांसोबत खाण्यावरून भांडणं केली असतील. बाजारात आपण एखादी वस्तू आणायला गेलो की तिथं दरांवरूनही विक्रेत्यासोबत वाद घालतो. पण खाद्यपदार्थांवरून असे वाद कधी कधी कोर्टात पोहोचल्याचं ऐकलं आहे का? अशाच एका प्रकरणाचा नुकताच निकाल लागला आहे. एका केकचा
(Cake) वाद कोर्टात पोहोचला आणि तब्बल 7 वर्षांनी त्याचा निकाल लागला आहे
(Cake court case).
यूकेतील हे प्रकरण आहे. इथल्या एका व्यक्तीने एका बेकरीविरोधात न्यायालयात तक्रार नेली. बेकरीवर भेदभाव केल्याचा आरोप लावला. तब्बल 7 वर्षे हे प्रकरण कोर्टात होतं. सुरुवातीला या व्यक्तीच्या बाजूने निकाल लागला होता पण अखेर सात वर्षांनी त्याच्या पदरी निराशाच पडली.
गॅरेथ ली असं या याचिकाकर्त्याचं नाव आहे. गॅरेश हा समलैंगिक व्यक्तींच्या अधिकारासाठी काम करतो. त्याने एका बेकरीविरोधात कोर्टात याचिका दाखल केली.
हे वाचा - अनोळख्या व्यक्तीसोबत एक रात्र घालवताच पुरुष झाला प्रेग्नंट; बाळाला जन्मही दिला
बेकरीने केकवर सपोर्ट गे मॅरेज असं लिहून देण्यास नकार दिला. ख्रिश्चन व्यक्तींमार्फत चालवल्या जाणाऱ्या बेलफास्ट बेकरीने केकवर सपोर्ट गे मॅरेजचं स्लोगन देण्यास नकार दिला. हा ख्रिश्चन धर्माच्या नियमांचं उल्लंघन असल्याचं बेकरीने सांगतिलं. हा भेदभाव आरोप करत गॅरेथने 2014 साली त्यांनी कायदेशीर लढ्याला सुरुवात केली.
कनिष्ठ न्यायालायात गॅरेथच्या बाजूने निकाल लावण्यात आला. बेकरीवर भेदभाव केल्याचा दोष लावला गेला. पण 2018 साली सुप्रीम कोर्टाने कनिष्ठ न्यायालयाचा निकालावर असहमती दर्शवत बेकरीच्या पक्षात निर्णय दिला. त्यानंतर गॅरेथने युरोपियन कोर्ट ऑफ ह्युमन राइट्सकडे धाव घेतली.
हे वाचा - 'झोपल्यानंतर तो...', नवऱ्याच्या विचित्र सवयीला वैतागली महिला; मांडली आपली व्यथा
मीडिया रिपोर्टनुसार गे राइट अॅक्टिविस्ट गॅरेथला युरोपीय मानवाधिकार न्यायालाने झटका दिला आहे. या प्रकरणाला काहीच आधार नाही म्हणत गॅरेथ यांची याचिका फेटाळण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.