या मातृत्वाला सलाम! लेकीच्या सुखासाठी आई होणार गरोदर, आजी देणार नातवाला जन्म

या मातृत्वाला सलाम! लेकीच्या सुखासाठी आई होणार गरोदर, आजी देणार नातवाला जन्म

आपल्या लेकीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजीच होणार नातवाची आई. इंग्लंडमधील नॉर्विच शहरातील हृदयस्पर्शी घटना.

  • Share this:

नॉर्विच, 19 फेब्रुवारी : आई होणे खुप पुण्याचं काम असतं असं म्हणतात. पण तरी बऱ्याच मुलींना आई होण्याचं सुख मिळत नाही. असे असले तरी, सध्या विज्ञानामुळं या सगळ्यावरही उपाय शोधण्यात आले आहेत. मात्र इंग्लंडमधील नॉर्विच शहरात एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. नॉर्विच येथील जॅस्मिन बाउली हिला वयाच्या सातव्या वर्षीच एक भयंकर आजार झाला होता. पेल्विक एविंग्ज सारकोमा नावाचा एक प्रकारचा कर्करोग जॅस्मिनला झाल्यामुळं ती कधीच आई होऊ शकणार नाही हे तिला कळले होते.

मात्र, वयाच्या 21 व्या वर्षाची ती प्रेमात पडली मात्र त्यानंतरही तिनं आई होण्याचा हट्ट धरला. मात्र आई झाल्यास तिच्या जीवाला धोका होऊ शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे होते. तरी जॅस्मिने विज्ञानाचा वापर करून हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीचा प्रयत्न केला त्यानंतर IVFद्वारे बाळाला जन्म देण्याचे ठरवले. मात्र हा प्रयत्न अपयशी ठरला. जॅस्मिनच्या आईने मात्र आपल्या मुलीला आई होण्याचे सुख मिळणार नाही, या विचाराने एक धाडसी निर्णय घेतला.

वाचा-रागावलेल्या पत्नीला असं मनवाल, तर काही मिनिटांतच दूर होईल तिचा रुसवा

जॅस्मिनची आई सब्रीना (39) हिनं आपल्या मुलीच्या बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला आहे. सरोगसी पद्धतीने सब्रीना जावई डॅनियलचे शुक्राणू वापरून गर्भधारणा करेल. परंतु आता त्यांच्या स्वप्नातील कुटुंब पूर्ण करण्यासाठी त्यांना 20,000 डॉलर्सची गरज आहे. याबाबत सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत सब्रीनाने, “मला असे वाटते की मी माझ्या मुलीसाठी आणि तिच्या जोडीदारासाठी करू शकणारी ही एकमेव आणि सर्वात मोठी गोष्ट आहे. त्यांना जीवनातले सगळ्यात चांगले गिफ्ट मला द्यायचे आहे. मी अभिमानाने आई आणि गर्वाने आजी होईल”, असे सांगितले.

वाचा-Tik Tokच्या स्कल चॅलेंजमुळे सांगलीत विद्यार्थी जखमी, तुमची मुलं तर नाही करत चूक?

जॅस्मिनच्या कर्करोगावर लहानपणीच उपचार करण्यात आले होते. मात्र त्यावेळी रेडिओथेरपीमुळे तिच्या गर्भाशयात नुकसान केले. आपण कधीच आई होणार नाही, या विचाराने जॅस्मिननं अनेक वेळा जीवन संपवण्याचाही विचार केला. मात्र आता तिच्या आयुष्यात तिची आईच तिचे हे स्वप्न पूर्ण करणार आहे. चार मुलांची आई असलेली सब्रीना आता आपल्या नातीला जन्म देण्यासाठी उत्सुक आहे. सब्रीनाने बाळाला जन्म दिल्यानंतर बाळाला डॅनिअल आणि जॅस्मिनच्या ताब्यात देऊन कागदपत्रावर सह्या करण्यात येतील. मात्र या सगळ्यासाठी त्यांना 20 हजार डॉलर जमा करायचे आहेत. त्यासाठी मदत करण्याचे आवाहन सब्रीनाने सोशल मीडियावरून केले आहे.

वाचा-तेलंगणातल्या कृष्णाच्या स्वप्नात आले ट्रम्प, आता 6 फुट मूर्तीची करतो पूजा

First published: February 19, 2020, 1:58 PM IST
Tags:

ताज्या बातम्या