VIDEO: अपघातानंतर 6 दिवसांनी कोमातून आला बाहेर, पुढे जे काय झालं ते पाहून डॉक्टरही चक्रावले

VIDEO: अपघातानंतर 6 दिवसांनी कोमातून आला बाहेर, पुढे जे काय झालं ते पाहून डॉक्टरही चक्रावले

6 दिवसांनी कोमातून बाहेर आल्यानंतर या खेळाडूनं जे काही केलं ते पाहून डॉक्टरही हैराण झाले. पाहा त्याची ही मुलाखत.

  • Share this:

लंडन, 03 जून : इंग्लंडमध्ये सोशल मीडियावर चर्चेत येणारे एक प्रकरण समोर आलं आहे. येथे 2014 मध्ये, रोरी कर्टिस (Rory Curtis) नावाच्या फुटबॉलरचा एक भयंकर अपघात झाला होता. ज्यानंतर तो 6 दिवस कोमामध्ये होता. मात्र धक्कादायक गोष्ट अशी आहे की कोमामधून उठल्यानंतर तो खूप चांगलं फ्रेंच बोलू लागला. एवढंच नाही तर त्याला अपघाताआधीची 12 वर्षात काय घडलं हेही आठवत नव्हतं.

कर्टिस इंग्लंडमध्ये राहतो आणि 18व्या शतकात त्याचे पूर्वज फ्रान्सच्या नॉर्मंडी भागात राहत होते. मात्र त्याच्या आजोबांपासून वडिलांपर्यंत कोणालाच फ्रेंच भाषा येत नाही. मात्र कर्टिस फ्रेंच बोलायला लागल्यानंतर सगळे थक्क झाले. कर्टिसची ही कहाणी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे आणि लोक त्याचा पुर्नजन्म झाल्याचं बोलत आहेत. कर्टिस याबाबत सांगतो की, त्यानं कदाचित शाळेत कधीतरी फ्रेंच शिकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कोमामधून उठल्यानंतर तो ही भाषा अगदी चांगल्या प्रकारे बोलब लागला. हे सर्व कोठून शिकले हेदेखील आठवत नाही.

वाचा-कंबर दुखायला लागली म्हणून झाला अ‍ॅडमिट, CT Scan रिपोर्ट पाहून डॉक्टर हैराण

काही दिवसांत विसरूनही गेला फ्रेंच

BBCच्या रिपोर्टनुसार कर्टिस कोमातून बाहेर आल्यानंतर फ्रेंच बोलायला लागला खरा मात्र थोड्याच दिवसात तो विसरूनही गेला. ऑगस्ट 2014 मध्ये कर्टिसचा गंभीर अपघात झाला होता, त्यानंतर त्याला कारमधून बाहेर काढण्यासाठी 40 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागला. त्यांना बर्मिंघमच्या रुग्णालयात नेण्यात आले आणि तेथे तो 6 दिवस कोमात होता.

वाचा-...आणि लिफ्टच्या दरवाजाला लटकली चिमुरडी; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO व्हायरल

कोमातून बाहेर आला तेव्हा 10 वर्षांचं होतं डोकं

कर्टिसचा अपघात झाला तेव्हा त्याचं वय 22 वर्ष होते. मात्र कोमातून बाहेर आला तेव्हा त्याचं वय 12 वर्ष होतं. कारण कर्टिस त्याच्या आयुष्यातील 12 वर्ष विसरून गेला होता. फ्रेंच बोलण्याव्यतिरिक्त, तो केवळ 10 वर्ष आपलं वय असल्याचं सांगत होता. जाग आल्यानंतर कर्टिसने त्याच्या कुत्र्याचा शोध सुरु केला ज्याच्या आधी बर्‍याच वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. कर्टिस यांनी बीबीसीला सांगितले की आता परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली आहे, परंतु आता दुसरे काही आठवत नाही. महत्त्वाचे म्हणजे कर्टिस मॅन्चेस्टर युनायटेडकडून फुटबॉल खेळत असे. मात्र, या अपघातानंतर त्याची कारकीर्द संपली.

वाचा-चालत्या ट्रकनं घेतला पेट तरी ड्रायव्हर थांबला नाही, पुढे गेला आणि...

First published: June 2, 2020, 8:57 PM IST
Tags:

ताज्या बातम्या