मराठी बातम्या /बातम्या /विदेश /ही विमानसेवा देतेय दुबईत मोफत राहण्याची संधी, वाचा कुणाला घेता येईल फायदा

ही विमानसेवा देतेय दुबईत मोफत राहण्याची संधी, वाचा कुणाला घेता येईल फायदा

Dubai Connect अशी ही योजना असून यामध्ये या विमान कंपनीतून दुबईला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोफत हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा दिली जाणार आहे.

Dubai Connect अशी ही योजना असून यामध्ये या विमान कंपनीतून दुबईला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोफत हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा दिली जाणार आहे.

Dubai Connect अशी ही योजना असून यामध्ये या विमान कंपनीतून दुबईला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोफत हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा दिली जाणार आहे.

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर: कोरोनाच्या (Corornavirus) या संकटकाळात सर्व प्रकारच्या वाहतूक व्यवस्था बंद होत्या. जगभरातील विमान व्यवस्था देखील बंद होती. त्यानंतर हळूहळू देशांतर्गत विमानसेवा सुरु करण्यात आली, 31 डिसेंबरपर्यंत व्यावसायिक आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद आहेत. मे महिन्यापासून 'वंदे भारत मिशन'अंतर्गत आणि जुलै महिन्यापासून 'द्विपक्षीय एअर बबल' करारांअंतर्गत काही देशातील विशेष आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. भारताने जवळपास 18 देशांबरोबर 'एअर बबल' (Air Bubble) करार केला आहे.

दरम्यान पीपीई किट्स आणि कोरोनाची चाचणी करूनच विमानप्रवासाला परवानगी देण्यात येत होती. त्यामुळे आता एमिरेट्सच्या (Emirates) विमान सेवेने नागरिकांसाठी हा प्रवास सुखकर व्हावा यासाठी नवीन योजना आणली आहे. Dubai Connect अशी ही योजना असून यामध्ये या विमान कंपनीतून दुबईला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोफत हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा दिली जाणार आहे.

एखाद्या प्रवाशाला दुबईमध्ये 10 तासांपेक्षा अधिक काळ राहायचे असल्यास त्यांना मोफत हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही सुविधा विमान कंपनीच्या वतीने देण्यात येणार असून प्रवाशांना यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. यामध्ये प्रवाशांना फोर स्टार आणि फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मोफत राहण्यास मिळणार आहे. यामध्ये ग्राऊंड ट्रान्सफर, हॉटेलमध्ये विनामूल्य जेवण आणि यूएईमध्ये तुमचे वास्तव्य 10 ते 24 तासांच्या दरम्यान असेल तर तात्काळ विझा देखील उपलब्ध करून दिला जाणार आहे. 1 डिसेंबर 2020 पासून एमिरेट्स आपली विमानसेवा पुन्हा सुरु करणार आहे. 25 मार्चपासून कोरोनाच्या संकटामुळे कंपनीने सर्व विमानसेवा बंद केली होती असून देशांतर्गत, परदेशी आणि सर्व प्रकारची विमानसेवा बंद केली होती.

कुणाला मिळणार लाभ?

एमिरेट्सच्या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. इकॉनॉमी क्लास आणि फर्स्ट क्लास मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यामध्ये तुम्ही सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. यामध्ये कोरोना चाचणीच्या निगेटिव्ह रिपोर्टचा देखील समावेश आहे. दुबई विमानतळावर उतरल्यानंतर तुम्हाला PCR टेस्ट करायला लागल्यास तुम्हाला Dubai Connect चा लाभ घेता येणार नाही.

यासाठी तुम्हाला कितीवेळी दुबईत थांबणे गरजेचे आहे ?

दुबईमध्ये तुम्हाला यासाठी 10 ते 24 तास थांबणे गरजेचे आहे. यामध्ये इकॉनॉमिक क्लास, बिजनेस क्लास आणि फर्स्ट क्लास मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या दुबई कनेक्ट सर्विसचा लाभ घेता येणार आहे. केवळ दोन प्रवासामध्ये तुम्हाला या सेवेचा लाभ घेता येणार असून Emirates व्यतिरिक्त कोणत्याही विमानसेवेचा वापर केल्यास हा लाभ मिळणार नाही.. यामध्ये दीर्घकालीन विमानप्रवास असणाऱ्या फ्लाईटमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यामधून प्रवास करता येणार नाही.

दीर्घकाळच्या प्रवास करणाऱ्यांना कुठे राहण्याची सुविधा उपलब्ध करून देणार ?

या योजनेसाठी पात्र असणाऱ्या प्रवाशांना दुबईमधील कॉपरथॉन या फोर स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. किंवा दुबईमधील फाईव्ह स्टार ली-मेरिडियन हॉटेलमध्ये राहण्याची सेवा मिळणार आहे. या स्कीमचा फायदा घेण्यासाठी तुम्ही दुबईला जाण्यापूर्वी 24 तास आधी दुबईच्या सर्व्हिस डेस्कशी संपर्क साधणे गरजेचे आहे. तुम्ही दुबईच्या विमानतळावर उतरल्यानंतर या डेस्कशी संपर्क करून तुमची पुढील प्रक्रिया करून पूर्ण करून योजनेचा लाभ घेऊ शकता.

First published:

Tags: Travel by flight