श्रीलंकेत 10 दिवसांची आणीबाणी घोषित

श्रीलंकेत 10 दिवसांची आणीबाणी घोषित

गेल्या काही दिवसांपासून श्रीलंकेत दोन धर्मांमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरू आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झालेत.

  • Share this:

श्रीलंका, 06 मार्च : श्रीलंकेच्या कँडीमध्ये धार्मिक दंगलीनंतर 10 दिवसांची आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.सरकारचं म्हणणं आहे की आणीबाणी लागू करण्याचा हेतू हिंसा पसरवणाऱ्या लोकांविरोधात कठोर कारवाई करणं एवढाच आहे. श्रीलंकेच्या मीडियानुसार, हे निर्णय सोमवारी कॅंडीच्या स्थितीचा अंदाज घेतल्यानंतर घेतले गेले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून श्रीलंकेत दोन धर्मांमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरू आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झालेत.

दरम्यान, एकदिवसीय क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघ श्रीलंकेत आहे. आणि या मालिकेतील पहिला सामना कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. यासंदर्भात बीसीसीआयनं संघाला कुठल्याही प्रकारचा धोका नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

First Published: Mar 6, 2018 03:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading