न्यूयाॅर्कमध्ये आणीबाणी, कोरोना व्हायरसमुळे 19 जणांचा मृत्यू

न्यूयाॅर्कमध्ये आणीबाणी, कोरोना व्हायरसमुळे 19 जणांचा मृत्यू

न्यूयॉर्कमध्ये सध्या 89 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे

  • Share this:

वॉशिग्टंन, 8 मार्च : अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यात कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शनिवारपर्यंत अमेरिकेत तब्बल 19 जणांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.

न्यूयॉर्कमध्ये सध्या 89 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली असून मृत्यांचा आकडा वाढून 19 पर्यंत पोहोचला आहे. न्यूयॉर्कचे गव्हर्नर एन्ड्रयू कुओमो यांनी सांगितले की, शनिवारी राज्यात 13 नवीन प्रकरणं समोर आली आहे. ज्यामुळे रुग्णांचा आकडा 89 पर्यंत पोहोचला आहे. यामुळे राज्यात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

संबंधित - 87 वर्षीय कोरोना पीडितासाठी 20 वर्षीय डॉक्टर झाला बाबा, रुग्णाचा हट्ट पुरवला

अमेरिकेनंतर भारतातही कोरोना व्हारसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. केरळात पुन्हा कोरोना व्हायरसने शिरकाव केला आहे. एकाच कुटुंबातील 5 जणांना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 39 झाली आहे.

संबंधित - VIDEO: अरे देवा! कोरोनामुळे टॉयलेट पेपरचा तुटवडा, न्यूज पेपरनं रिकामी सोडली पानं

केरळच्या आरोग्यमंत्री के.के. शैलजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळात कोरोनाव्हायरसचे 5 रुग्ण आढळून आलेत. त्यापैकी तिघं जण इटलीला गेले होते. भारतात परतल्यानंतर ते आपल्या 2 नातेवाईकांच्या संपर्कात आले होते. ज्या मूळ 3 रुग्णांना कोरोना व्हायरसची लागण झाली ते पठ्ठणमथित्ता (Pathanamthitta) चे रहिवासी आहे. यामध्ये दाम्पत्य आणि त्यांच्या मुलाचा समावेश आहे. त्यानंतर केरळच्या आरोग्य विभागानं सूचना जारी केली आहे. ज्या विमानातून या कुटुंबानं प्रवास केला होता, त्या विमानातील प्रवाशांनी आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. व्हेनिका ते डोहा कतार एअरवेज फ्लाइट 126 ने प्रवास केला आणि त्यानंतर डोहा ते कोची त्यांनी फ्लाइट 514 ने ते केरळात पोहोचले.

First published: March 8, 2020, 2:27 PM IST

ताज्या बातम्या