मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Elon Musk यांना अमेरिकेच्या नियामकाकडून गंभीर इशारा; कायद्याची करून दिली आठवण 

Elon Musk यांना अमेरिकेच्या नियामकाकडून गंभीर इशारा; कायद्याची करून दिली आठवण 

दुसरीकडे, ``ट्विटर आर्थिक अडचणीतून वाटचाल करत आहे आणि स्थिती सुधारली नाही तर कंपनी दिवाळखोरीत निघू शकते,`` असा इशारा एलॉन मस्क यांनी गुरुवारी आपल्या कर्मचाऱ्यांना दिला आहे.

दुसरीकडे, ``ट्विटर आर्थिक अडचणीतून वाटचाल करत आहे आणि स्थिती सुधारली नाही तर कंपनी दिवाळखोरीत निघू शकते,`` असा इशारा एलॉन मस्क यांनी गुरुवारी आपल्या कर्मचाऱ्यांना दिला आहे.

दुसरीकडे, ``ट्विटर आर्थिक अडचणीतून वाटचाल करत आहे आणि स्थिती सुधारली नाही तर कंपनी दिवाळखोरीत निघू शकते,`` असा इशारा एलॉन मस्क यांनी गुरुवारी आपल्या कर्मचाऱ्यांना दिला आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर : बेधडक निर्णयांमुळे गेल्या काही दिवसांपासून ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क चर्चेत आहेत. मस्क यांनी ट्विटरची सूत्रं हाती घेतल्यावर ब्लू सबस्क्रिप्शन सर्व्हिसबाबत आणि मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातीविषयी निर्णय घेतला. यामुळे एकच खळबळ उडाली. या दोन्ही गोष्टी ताज्या असतानाच गुरुवारी (10 नोव्हेंबर 22) ट्विटरच्या प्रमुख सुरक्षा अधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यामुळे ट्विटरमधल्या अराजकतेत आणखी वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ट्विटरला अमेरिकेच्या नियामकाकडून गंभीर इशारा देण्यात आला आहे. ``कोणत्याही कंपनीचा सीईओ हा कायद्यापेक्षा मोठा नाही, कंपन्यांना आमच्या आदेशाचं पालन करावं लागेल,`` असं नियामकाने म्हटलं आहे. `एनडी टीव्ही`ने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

मस्क यांच्या मालकीच्या ट्विटरमधील प्रमुख सुरक्षा अधिकाऱ्यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर कंपनीतील अराजक आणखी वाढल्याचं दिसून आलं. या पार्श्वभूमीवर अमेरिकी नियामकाने ट्विटरला कडक इशारा दिला आहे. ट्विटरवर नवीन वादग्रस्त फीचर्स लॉंच केल्याच्या एका दिवसानंतर हे राजीनामे देण्यात आले आहेत. टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक एलॉन मस्क यांनी 44 अब्ज डॉलर्सना ट्विटर कंपनी खरेदी केली आहे. त्यानंतर त्यांनी काही नवीन फीचर्स लॉंच करण्याचा निर्णय घेतला होता. आता ही फीचर्स लॉंच करण्यात आली आहेत.

ट्विटरने ब्लू सबस्क्रिप्शन सर्व्हिस लॉंच केली होती. यात ब्लू टिकसाठी वापरकर्त्यांना दरमहा आठ डॉलर द्यावे लागणार आहेत. तसंच हाय-प्रोफाइल अकाउंट्ससाठी एक वेगळा ऑफिशियल ‘ग्रे बॅच’ जारी करण्यात आला. त्यानंतर मस्क यांनी अचानक ‘ग्रे बॅच’ रद्द करण्याचा निर्णय घेतला. यामुळे पे सर्व्हिस सुरू करण्यावर परिणाम झाला. ही सेवा सध्या फक्त यूएसमधील आयफोन मोबाईल अ‍ॅपवर उपलब्ध आहे.

ट्विटरमधून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना भारतीय रोजगार कायद्याचं संरक्षण मिळणार का?

ट्विटरवर ब्लू सर्व्हिस लॉंच झाल्यानंतर अनेक लोकांनी एनबीए स्टार, लेब्रॉन जेम्स आणि माजी ब्रिटिश पंतप्रधान टोनी ब्लेअर यांसारख्या सेलेब्रिटी आणि राजकारण्यांची बनावट अकाउंट सुरू केली. यामुळे अमेरिकेतील ग्राहकांच्या हितांचं संरक्षण करणारी अथॉरिटी फेडरल ट्रेड कमिशनने ट्विटरला सावधानीचा इशारा दिला आहे. ही अथॉरिटी देशाच्या नियमांचं उल्लंघन करत नाहीत ना यावर लक्ष ठेवून असते. त्यांनी ट्विटरकडून सुरक्षा आणि गोपनीयतेच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचं लक्षात आल्यावर कंपनीच्या व्यवहारांवर लक्ष ठेवायला सुरुवात केली.

दरम्यान, ``आम्ही ट्विटरमध्ये अलीकडे घडलेल्या घटनांमुळे चिंतेत आहोत. कोणाताही सीईओ किंवा कंपनी कायद्यापेक्षा मोठी नसते. त्यामुळे कंपन्यांना आमच्या आदेशाचे पालन करावं लागेल,`` असं `एफटीसी`च्या एका प्रवक्यानं निवेदनात म्हटलं आहे. अमेरिकी गोपनीयतेच्या नियमांचे पालन करण्याच्या ट्विटरच्या मागील आश्वासनांची आठवण करून देत प्रवक्त्याने हे सांगितले आहे. एफटीसीच्या निर्णयाचे उल्लंघन केल्याबद्दल ट्विटरला लाखो डॉलर्सचा दंड भरावा लागू शकतो.

दरम्यान ट्विटरच्या प्रमुख सुरक्षा अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. याबाबत ट्विटरच्या मुख्य सुरक्षा अधिकारी ली किसनर यांनी ट्विट करत सांगितलं की ``मी ट्विटर सोडण्याचा कठीण निर्णय घेतला आहे.`` किसनर यांनी अन्य प्रमुख गोपनीय आणि सुरक्षा अधिकाऱ्यांसह राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. अमेरिकी माध्यमांमधील वृत्तानुसार, ट्विटरचे हेड ऑफ ट्रस्ट अँड सेफ्टी जोएल रॉथ यांनी जाहिरातदारांसमोर मस्क यांच्या कंटेट मॉडरेशन पॉलिसीचा बचाव केल्यानंतर एका दिवसात राजीनामा दिला आहे.

दुसरीकडे, ``ट्विटर आर्थिक अडचणीतून वाटचाल करत आहे आणि स्थिती सुधारली नाही तर कंपनी दिवाळखोरीत निघू शकते,`` असा इशारा एलॉन मस्क यांनी गुरुवारी आपल्या कर्मचाऱ्यांना दिला आहे.

First published:

Tags: Elon musk, Twitter