Home /News /videsh /

मोठी बातमी! एलॉन मस्क यांचा अल्टिमेटम; 'या' कारणामुळे Twitter चं डिल फसण्याची शक्यता

मोठी बातमी! एलॉन मस्क यांचा अल्टिमेटम; 'या' कारणामुळे Twitter चं डिल फसण्याची शक्यता

एलॉन मस्क यांनी एक नवं ट्विट केलं आहे. कंपनी जोपर्यंत बनावट युझर्स 5 टक्क्यांहून कमी असल्याचा पुरावा देत नाही, तोपर्यंत ट्विटर खरेदीसंदर्भातला करार पुढे जाऊ शकत नाही, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

  मुंबई, 17 मे: सर्वांत लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्समध्ये ट्विटरचा (Twitter) समावेश होतो. जगभरातले अनेक सेलेब्रिटी, राजकीय नेते, उद्योग क्षेत्रातले दिग्गज ट्विटरचा वापर करतात. व्यक्त होण्यासाठी प्रभावी माध्यम समजलं जाणारं ट्विटर गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा चर्चेत आलं आहे. जगप्रसिद्ध उद्योगपती आणि टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर खरेदी करण्यासाठी पाऊल उचलल्याने उद्योग, तसंच तंत्रज्ञान क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तसंच याबाबत वेगवान घडामोडी घडत आहेत. त्यातच आता एलॉन मस्क यांनी एक नवं ट्विट केलं आहे. कंपनी जोपर्यंत बनावट युझर्स 5 टक्क्यांहून कमी असल्याचा पुरावा देत नाही, तोपर्यंत ट्विटर खरेदीसंदर्भातला करार पुढे जाऊ शकत नाही, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे फेक अकाउंट्ससंदर्भात (Fake Account) काही नवे प्रश्न तयार झाले आहेत. 'टीव्ही नाइन हिंदी'ने याविषयीचं वृत्त दिलं आहे. ``ट्विटरवर 20 टक्के किंवा त्याहून अधिक बनावट आणि स्पॅम अकाउंट्स (Spam Account) आहेत. 5 टक्क्यांहून कमी फेक अकाउंट्स असल्याचा दावा कंपनी करते. परंतु, त्या तुलनेत ही संख्या 4 पट आहे. माझी 44 अब्ज डॉलरची ऑफर ही दाव्यानुसार होती,`` असं एलॉन मस्क यांनी एका ट्विटला उत्तर देताना म्हटलं आहे. ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी 5 टक्क्यांपेक्षा कमी फेक अकाउंट्स असल्याचं स्वीकारण्यास जाहीरपणे नकार दिला आहे. त्यावर जोपर्यंत फेक अकाउंट्सबाबत पुरावे दिले जात नाहीत तोपर्यंत हा करार पुढे जाऊ शकत नाही, असं मस्क यांनी स्पष्ट केलं आहे. महिलेचं अमानुष कृत्य; या कारणामुळे पाळीव श्वानांवर झाडल्या 170 गोळ्या
  गेल्या चार तिमाहीत ट्विटरच्या फेक अकाउंट्सची संख्या 4 टक्क्यांहून कमी झाली आहे, असं ट्वीट ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल (CEO Parag Agrawal) यांनी केलं होतं. या ट्विटला उत्तर देताना मस्क यांनी म्हटलं ``स्पॅमबद्दल संपूर्ण माहिती नसल्यास, कोणती सेवा मिळत आहे, हे जाहिरातदाराला कसं कळेल. ट्विटरच्या आर्थिक आरोग्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे.``
  दरम्यान, ट्विटर युझर्सच्या बाबतीत 9 ते 15 टक्के सक्रिय बॉट असू शकतात. या बॉट किंवा स्पॅम अकाउंट्सच्या मदतीनं सोशल मीडियावरच्या चळवळींना चालना दिली जाते. सध्या ट्विटर कोणत्याही प्रकारच्या रिअल आयडेंटिटीची (Real Identity) मागणी करत नाही. एखाद्या अकाउंटवरून चुकीच्या पद्धतीनं अ‍ॅक्टिव्हिटी होत असेल तरच संबंधित यूजरवर कारवाई केली जाते, असं स्वतंत्र संशोधकांचं (Independent Researcher) मत आहे. मियामी येथे आयोजित एका चर्चासत्रात बोलताना मस्क म्हणाले, ``तुम्ही त्यांच्या दाव्यापेक्षा वाईट असलेल्या गोष्टीसाठी जास्त किंमत देऊ शकत नाही.`` ट्विटरचं डील एका वेगळ्या किमतीवर व्यवहार्य आहे का, असा प्रश्न मस्क यांना या वेळी विचारला असता, त्यांनी त्यास नकार दर्शवला नाही. ``मी जितकी विचारणा करतो, तितकी माझी चिंता वाढू लागते,`` असं मस्क यांनी सांगितलं. मोठी बातमी: चीन करतोय बॅलेस्टिक मिसाईलची चाचणी, Satellite Image आली समोर
  ``कंपनीच्या फेक अकाउंट्सची माहिती मिळवण्याची पद्धत खूप क्लिष्ट आहे. याबाबतची माहिती केवळ त्याच लोकांना आहे. ही गोष्ट अत्यंत रहस्यमय अशी म्हणता येईल,`` असं एलॉन मस्क यांनी म्हटलं आहे. मस्क यांच्या या वक्तव्यानंतर ट्विटरच्या शेअर्समध्ये घसरण होताना दिसत आहे.
  First published:

  Tags: Elon musk, Twitter, World news

  पुढील बातम्या