Home /News /videsh /

Russia-Ukraine: घरात घुसलेल्या रुस सैन्याला असं लावलं पळवून, वृद्ध युक्रेनी दाम्पत्याचा थरारक VIDEO VIRAL

Russia-Ukraine: घरात घुसलेल्या रुस सैन्याला असं लावलं पळवून, वृद्ध युक्रेनी दाम्पत्याचा थरारक VIDEO VIRAL

युक्रेनमधला एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) खूप व्हायरल होत आहे. युक्रेनमधल्या एका वृद्ध जोडप्यानं (Older couple) रशियन सैनिकांविरुद्ध मोठं धाडस दाखवल्याचं या व्हिडिओतून दिसत आहे.

     मुंबई, 12 मार्च-  गेल्या 15 ते 16 दिवसांपासून रशिया-युक्रेन (Russia-Ukraine) या देशांमध्ये युद्ध (War) सुरू आहे. रशिया-युक्रेनमधल्या शहरांवर सातत्याने हल्ले (Attack) करत आहे. या हल्ल्यांमुळे युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणावर वित्त आणि जीवित हानी होत आहे. लाखो युक्रेनियन नागरिक निर्वासित झाले आहेत. याचदरम्यान युक्रेनमधला एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) खूप व्हायरल होत आहे. युक्रेनमधल्या एका वृद्ध जोडप्यानं (Older couple) रशियन सैनिकांविरुद्ध मोठं धाडस दाखवल्याचं या व्हिडिओतून दिसत आहे. या जोडप्याला घरातून बाहेर काढण्यासाठी आलेले सशस्त्र रशियन सैनिक (Russian Soldiers) या वृद्धांनी केलेल्या प्रतिकारापुढे हतबल झाले आणि त्यांना तिथून रिकाम्या हातांनी परतावं लागल्याचं या व्हिडिओतून दिसत आहे. याविषयीचं वृत्त `लाइव्ह हिंदुस्तान`ने दिलं आहे. युक्रेनमधला हा वृद्ध जोडप्याचा व्हिडीओ सीसीटीव्हीत टिपला गेला आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत लाखो जणांनी हा व्हिडीओ पाहिला असून, या जोडप्याचं सर्व जण कौतुक करत आहेत. काही ट्विटर (Twitter) युझर्सनी याला धक्कादायक साहस म्हटलं आहे. `प्रत्येक युक्रेनियन नागरिकाकडे रशियन सैन्याविरोधात लढण्यासाठी असंच धाडस असणं गरजेचं आहे,` असं दुसऱ्या एका युझरने म्हटलं आहे. युक्रेनमधल्या मायकोलायिव्ह ओब्लास्ट प्रांतातल्या व्होज्नेसेंस्क गावात ही घटना घडली आहे. या गावातल्या एका घरात रशियन सैनिकांनी घुसखोरी केली. तीन सैनिक या घराच्या परिसरात दाखल झाले. एक सैनिक घराबाहेर थांबला. घराच्या परिसरात येताच रशियन सैनिक युक्रेनियन सैनिकांचा शोध घेण्यासाठी परिसरात विखुरल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. दरम्यान, या घरात राहणारं वृद्ध जोडपं घराबाहेर येतं आणि रशियन सैनिकांवर ओरडू लागतं. या जोडप्याचा आवाज बंद करण्यासाठी आणि त्यांना घाबरवण्याच्या उद्देशानं एक रशियन सैनिक हवेत गोळीबार (Firing) करतो; पण त्याचा या जोडप्यावर काहीही परिणाम होत नाही. हे दांपत्य सैनिकांवर संताप व्यक्त करत त्यांना घराबाहेर जाण्यास सांगत असल्याचं या फुटेजमध्ये दिसत आहे.
    हे जोडपं आणि रशियन सैनिकांमधला वाद काही वेळ सुरूच राहतो. शेवटी या दांपत्यानं केलेल्या प्रतिकारापुढे रशियन सैनिक हतबल होतात आणि परिसराबाहेर निघून जाऊ लागतात. त्यानंतर हे युक्रेनियन दांपत्य रशियन सैनिकांच्या मागे घराच्या मुख्य दरवाजापर्यंत येतं. यादरम्यान एक कुत्रा सैनिकांवर भुंकताना दिसत आहे. रशियन सैनिक निघून जाताच हे जोडपं घराचा मुख्य दरवाजा बंद करतं आणि घरात निघून जातं असं या व्हिडीओत दिसत आहे. एका वृद्ध जोडप्यानं रशियन सैनिकांना केलेला विरोध सध्या चर्चेचा विषय ठरला असून, त्यांच्या धाडसाचं कौतुक केलं जात आहे.
    First published:

    Tags: Russia Ukraine, Video viral

    पुढील बातम्या