मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

नासा पुन्हा चंद्रावर पाठवणार मानव, आर्टेमिस अकॉर्डमध्ये 8 देशांचा सहभाग

नासा पुन्हा चंद्रावर पाठवणार मानव, आर्टेमिस अकॉर्डमध्ये 8 देशांचा सहभाग

अवकाश संशोधनात अग्रेसर असलेल्या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेनी (NASA) आता पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी कंबर कसली आहे.

अवकाश संशोधनात अग्रेसर असलेल्या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेनी (NASA) आता पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी कंबर कसली आहे.

अवकाश संशोधनात अग्रेसर असलेल्या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेनी (NASA) आता पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी कंबर कसली आहे.

  • Published by:  Shreyas

वॉशिंग्टन, 15 ऑक्टोबर : अवकाश संशोधनात अग्रेसर असलेल्या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेनी (NASA) आता पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी कंबर कसली आहे. पण या वेळी आठ देश एकत्र येऊन अर्टेमिस हे नासाचं अभियान राबवणार आहेत. या अभियानासंबंधी करारांवर म्हणजेच अर्टेमिस अकॉर्डवर या देशांनी स्वाक्षरी केल्याची माहिती नासाने मंगळवारी दिली.

अर्टेमिस अभियानाच्या माध्यमातून 2024 ला पुन्हा एकदा माणसाला चंद्रावर घेऊन जाण्यात येणार असून या अभियानात ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इटली, जपान, लक्झमबर्ग, संयुक्त अरब अमिराती (यूएई), ब्रिटन आणि अमेरिका हे आठ देश सहभागी होणार आहेत. याबद्दल नासातील व्यवस्थापक जिम ब्रिडेन्स्टाइन म्हणाले, ‘आतापर्यंतच्या मानवी अवकाश संशोधनाच्या इतिहासातील अर्टेमिस हे सर्वांत मोठं आणि वैविध्यांनी भरलेलं असं अभियान ठरणार आहे. जगातील अनेक देशांच्या एकत्रित काम करण्याचं उदाहरण म्हणून अर्टेमिस अकॉर्ड्सकडे पाहिलं जाईल. आज आम्ही या करारावर स्वाक्षरी करून आमच्या सहकाऱ्यांसोबत चंद्रावरील गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी सज्ज झालो आहोत. त्याचबरोबर भविष्यात माणसाला अवकाशात सुरक्षित, शांततापूर्ण आणि समृद्धीचा अनुभव घेता यावा यासाठीचे नियम आम्ही या अभियानातून ठरवणार आहोत.’

या अभियानाचं नेतृत्व नासा करत आहे, त्यामुळे भविष्यातील मंगळ अभियानासाठीही आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन भागीदारी व्हावी असं नासाला वाटतं.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर असलेल्या बर्फाचा पिण्याचं पाणी म्हणून तसंच त्यातील मॉलिक्युल वेगळे करून अवकाशातील पुढच्या प्रवासावर जाणाऱ्या रॉकेट्ससाठी इंधन तयार करण्याचा नासाचा विचार आहे. नासाला गेटवे हे ऑर्बिटल स्पेस स्टेशन निर्माण करायचं आहे. या नव्या अभियानामुळे 1967 चा आउटर स्पेस करार पुन्हा लागू होत असून त्याचे 10 प्रमुख नियम असतील असंही नासानी म्हटलं आहे.

करारावर स्वाक्षरी करणारे देश अवकाश यात्रेदरम्यान शांतपणाने आणि पारदर्शक व्यवहार करतील, प्रत्येक सदस्य देश हार्डवेअर सिस्टिम विकसित करेल, आणि त्यांच्या अवकाशातील वस्तूंची नोंदणी करतील. हे देश आणिबाणीच्या प्रसंगी परस्परांना मदत करतील, त्यांचा वैज्ञानिक डाटा जाहीर करतील, अवकाशातील वारसा संरक्षणासाठी कटिबद्ध असतील तसंच अवकाशातील कचऱ्याची सुरक्षितपणे विल्हेवाट लावतील, हे नियम या अभियानात सहभागी झालेल्या आठ देशांना पाळावे लागतील.

रशियाची अवकाश संशोधन संस्था रॉसकॉसमॉसचे प्रमुख दिमित्री रोगोझिन यांनी काही दिवसांपूर्वीच रशिया नासाच्या महत्त्वाकांक्षी गेटवे स्पेस स्टेशन उपक्रमात सहभागी होणार नसल्याचं जाहीर केलं होतं. अमेरिका आणि रशियामध्ये गेल्या दोन दशकांपासून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या (ISS) माध्यमातून असलेलं सहकार्य संपुष्टात आल्याचं रशियाच्या या निर्णयामुळे स्पष्ट झालं आहे.

चीनचीही मोहीम

अवकाश संशोधनातील अमेरिकेचा स्पर्धक होऊ पाहणाऱ्या चीनलाही या करारात सहभागी करण्यात आलेलं नाही. चीनची त्याच्या आंतरराष्ट्रीय सहकाऱ्यांसोबत सध्या चांद्र मोहिम सुरू आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर नोंदवण्यात आलेल्या दैनंदिन उत्सर्जनाच्या नोंदी चिनी-जर्मन टीमने गेल्या महिन्यात जाहीर केल्या होत्या. चेंग ई4 लँडरने 2019 मध्ये या नोंदी केल्या आहेत. चंद्रावरील रेडिएशन म्हणजे उत्सर्जनामुळेच अंतराळवीरांना चंद्रावर दोन ते तीन महिनेच थांबता आलं असा निष्कर्ष चीनने काढला आहे. विशेष म्हणजे 1960 आणि 1970 मध्ये अमेरिकेनी पाठवलेल्या अपोलो यानानेही ही माहिती मिळवली नव्हती.

First published: