Home /News /videsh /

‘गझनी’ भीषण स्फोटांनी पुन्हा हादरलं, 8 जणांचा मृत्यू

‘गझनी’ भीषण स्फोटांनी पुन्हा हादरलं, 8 जणांचा मृत्यू

अफगाणिस्तान लष्कराने 3 हवाई हल्ले केले होते. यात 29 दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे.

    काबुल 8 नोव्हेंबर: अफगानिस्तान (Afghanistan) रविवारी स्फोटांनी पुन्हा हादरून गेलं. अफगाणिस्तानमधल्या गझनी (ghazni) शहरात हे भीषण स्फोट झाले. अफगाणिस्तानमधल्या टोलो न्यूज ने दिलेल्या वृत्तानुसार या स्फोटांमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. या आधी तालिबानच्या विरुद्ध अफगानिस्तानच्या लष्कराने मोठी कारवाई केली. यात 3 वेगवेगळ्या ठिकाणी हवाई हल्ले करण्यात आले. यात 29 दहशतवादी ठार झाल्याचं माहिती आहे. यात तालिबानचा गुप्तचर अधिकारी असल्याचं म्हटलं जातं. अफगानिस्तानच्या संरक्षण मंत्रालयने दिलेल्या माहितीनुसार हेलमंड प्रांतात केलेल्या हवाई हल्ल्यात तालिबानचे 10 दहशतवादी ठार झाले. तर कुंडुज प्रांतात साहब आणि खान अबाद जिल्ह्यांमध्ये 12 तालिबानी दहशतवादी ठार झाले. तर 6 जण गंभीर जखमी झाले. अफगाण लष्कराला प्रचंड मोठा शस्त्रसाठाही हाती लागला आहे. पाच दिवसांपूर्वी म्हणजे 2 नोव्हेंबरला अफगाणिस्तानची राजधानी काबूल  आत्मघातकी हल्ल्याने हादरून गेलं होतं. तिथल्या विद्यापीठात (Kabul University) इस्लामिक स्टेटने (IS) केलेल्या हल्ल्या हल्ल्यात 22 जण ठार झाले होते. त्यात विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हल्लेखोराने विद्यापीठाच्या आवारात प्रवेश करून स्वत:ला स्फोटकांनी उडवून दिलं आणि नंतर त्याच्या सोबत असलेल्या दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्यात या 22 जणांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला एवढा भीषण हल्ला होता की अनेकांना तिथलं दृश्य पाहूनच चक्कर आली. क्लास रुम्समध्ये रक्ताचे पाट वाहत होते. अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. स्फोटानंतर गोळीबार झाल्याने अनेकांचा जीव गेला आणि अनेक जण जखमी झालेत. विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी आश्रय घ्यायलाही उसंत मिळाली नाही. आठवडाभरात काबूलमधल्या शैक्षणिक संस्थांमध्ये झालेला हा दुसरा हल्ला आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या