बापरे! TikTok वर शेअर केला बेली डान्सचा व्हिडीओ; डान्सरला डांबलं तुरुंगात

बापरे! TikTok वर शेअर केला बेली डान्सचा व्हिडीओ; डान्सरला डांबलं तुरुंगात

या बेली डान्सरला (Belly dancer) 3 वर्षे तुरुंगवासाची (jail) शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

  • Share this:

कैरो, 28 जून : आजकाल प्रत्येकाला (TikTok) टिकटॉकचं वेड लागलं आहे. आपले वेगवेगळे व्हिडीओ टिकटॉकवर शेअर केले जातात. असाच आपला एक व्हिडीओ टिकटॉकवर शेअर करणं इजिप्तमधील एका बेली डान्सरला (belly dancer) चांगलंच महागात पडलं आहे. तिला जेलमध्ये टाकण्यात आलं आहे.

इजिप्तमधील प्रसिद्ध बेली डान्सर सामा एल-मॅसीला (Sama El-Masry) तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तिने आपल्या टिकटॉकवर व्हिडीओ शेअर केला होता आणि हा व्हिडीओ लोकांच्या उत्तेजना वाढवणाऱ्या असल्याचा आरोप तिच्यावर लावण्यात आला.

एप्रिलमध्ये मॅसीच्या सोशल मीडियावरील व्हिडीओ आणि फोटोंची तपासणी करण्यात आली.  तिने शेअर केलेले व्हिडीओ हे अनैतिक आणि लोकांना उत्तेजित करणारे आहेत, असा आरोप तिच्यावर लावण्यात आला आहे. त्यासाठी तिला कोर्टाने तीन वर्षांची जेल आणि 30 हजार पाउंड म्हणजे जवळपास 14 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

हे वाचा - बापरे! Lockdownच्या काळात दुप्पट झाल्या आत्महत्या, ही 5 कारणं ठरली जीवघेणी

काहिरातल्या एका कोर्टाने तिला शिक्षा सुनावली आहे. अनैतिकता पसरवण्याच्या उद्देशाने सामााने आपला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. इजिप्तमधील सिद्धांत आणि मूल्यांचं उल्लंघन केलं आहे, असं कोर्टाने निकाल देताना सांगितलं.

सामाने आपल्यावरील हे आरोप नाकारले आहेत. आपण निर्दोष असल्याचं तिने म्हटलं आहे. आपला हा व्हिडीओ फोनमधून चोरी करण्यात आला आहे आणि माझ्या परवानगीशिवायच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे, असं तिनं सांगितलं.

हे वाचा - भयंकर! लॉकडाऊनमुळे मोठं नुकसान झाल्यानं प्रतिष्ठित शाळेचा मालक बनला ब्लॅकमेलर!

कोर्टाच्या या निर्णयाबाबत इजिप्तमधील खासदार जॉन तलाट यांनी सांगितलं, स्वतंत्रता आणि भ्रामकता यामध्ये अंतर आहे. एल मॅसीसारख्या इतर महिलाही आपले व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून मूल्यांचं उल्लंघन करत आहेत, जे संविधानाविरोधात आहे.

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: June 28, 2020, 7:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading