लॉस एंजेल्स, 06 जुलै: अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजल्स शहराला भूकंपाचा धक्का बसला. अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्व्हेने दिलेल्या माहितीनुसार रिश्टर स्केलवर भूकंपाची तिव्रता 7.1 इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्र बिंदू लॉस एंजेल्सपासून 272 किलो मीटर उत्तरेकडील रिजक्रेस्ट येथे होता. भूकंपानंतर तब्बल 1 हजार 400 छोटे धक्के बसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
स्थानिक वेळेनुसार गुरुवारी 10 वाजून 33 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. विशेष म्हणजे गेल्या गुरुवारी दक्षिम कॅलिफोर्नियाला 6.4 तिव्रतेचा धक्का बसला होता. त्यानंतर हवामान विभागाने आणखी काही धक्के बसण्याची शक्यता व्यक्त केली होती. आठवड्याभरात भूकंपाचे वारंवार धक्के बसल्यामुळे नागरिकांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याआधी आलेल्या भूकंपाचा केंद्र बिंदू नवेडा शहरात होता. कॅलिफोर्निया राज्याला 1999मध्ये 7.7 तिव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला होता. त्यानंतर आज बसलेला हा दुसरा सर्वात शक्तीशाली धक्का मानला जातो.
United States Geological Survey: A M7.1 Earthquake strikes Southern California. More details awaited #UnitedStates
भूकंपामुळे अनेक इमारतींचे आणि रस्त्यांचे नुकसान झाले आहे. अनेक पायाभूत सुविधा विस्कळीत झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. भूकंपामुळे विमान सेवा विस्कळीत झाली आहे.
रानडुकराचा दिव्यांग तरुणावर हल्ला; जीव वाचवतानाची धडपड कॅमेऱ्यात कैद