काठमांडू, 19 मे: भारताचा शेजारील असलेले नेपाळ (Earthquake in Nepal) राष्ट्र आज पहाटे भूकंपाच्या धक्क्याने हादरले. नेपाळमध्ये रिक्टर स्केलवर 5.8 तीव्रतेचा भूकंपाची नोंद झाली आहे. नॅशनल अर्थक्वीक मॉनिटरिंग अँड रिसर्च सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, भल्यापहाटे हा भूकंपाचा धक्का जाणवला. सुदैवाने, अद्याप कुठेही जीवितहानी झाली नाही.
एनआयए या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे धक्के हे काठमांडूपासून उत्तर-पश्चिमपासून 113 किमी दूर अंतरावर पहाटे 5:42 वाजेच्या सुमारास जाणवले. भूकंपाचे केंद्रबिंदू हे लामजुंग जिल्ह्यातील भुलभुले इथं होतं. या भूकंपाची तीव्रता ही 5.8 इतकी नोंद झाली आहे.
फेब्रवारी महिन्यात सुद्धा नेपाळमधील लोबुयामध्ये भूकंपाचा तीव्र धक्का जाणवला होता. रिक्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 5.2 नोंद झाली होती. फेब्रुवारी महिन्यातच भारत-नेपाळ सीमेवर 4.0 तीव्रतेचा भूकंप आला होता. तर मागील एप्रिल महिन्यात सिक्किम नेपाळ सिमेवर 5.4 तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली होती. या भूकंपाचे धक्के आसाम, बिहार आणि पश्चिम बंगालला सुद्धा जाणवले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Earthquake, International, Nepal