मेक्सिकोत समुद्र किनारपट्टीवर 8.0 रिश्टर स्केलचा भूकंप; त्सुनामीची भीती

मेक्सिकोत समुद्र किनारपट्टीवर 8.0 रिश्टर स्केलचा भूकंप; त्सुनामीची भीती

या आधी 1985 साली इतक्या तीव्रतेचा भूकंप मेक्सिकोत झाला होता ज्यात हजारो लोकं मृत्यूमुखी पडले होते.

  • Share this:

मेक्सिको,08 सप्टेंबर: गेल्या 32 वर्षातला मेक्सिकोतला सगळ्यात जास्त तीव्रतेचा भूकंप झाला आहे. समुद्र किनारपट्टी लगत हा भूकंप झाला असल्यामुळे आता त्सुनामी येण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.

या आधी 1985 साली इतक्या तीव्रतेचा भूकंप मेक्सिकोत झाला होता ज्यात हजारो लोकं मृत्यूमुखी पडले होते. दरम्यान या भूकंपामुळे कुठलंही मोठे नुकसान झालं नसल्याचं समजत आहे. भूकंप झाल्यावर मेक्सिकोत अनेक लोकं रस्त्यावर धावून आले. काहींनी इतक्या तीव्रतेचा भूकंप कधीच अनुभवलं नसल्याचं कबूल केलं. या भूकंपाची सुरूवात शहराहून 123 कि.मी. दुर पीजिआपान इथं झाली होती.

मेक्सिकोच्या हवामान खात्याच्या माहितीनुसार या भूकंपामुळे त्सुनामी येण्याचा धोका वाढला आहे.

First published: September 8, 2017, 11:44 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading