बर्लिन, 23 जून : एका फळामुळे शहर हादरलं हे वाचून तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटेल. मात्र हे प्रत्यक्षात घडलं आहे. जर्मनीतल्या बेवेरिया प्रांतातील Schweinfurt शहरात अस घडलं आहे. या फळामुळे सहा जणांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. तर अख्खं पोस्ट ऑफिस रिकामं करावं लागलं आहे.
Schweinfurt मधील पोस्ट ऑफिसमध्ये (post office) शनिवारी एक पार्सल आलं आणि या पार्सलमधून खूप घाण वास येऊ लागला. त्यानंतर काही जणांना त्रासही होऊ लागला. वासामुळे त्यांना मळमळ जाणवू लागली, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. पोलीस आणि अग्निशमन दल पूर्ण तयारीनिशी घटनास्थळी दाखल झालं. खबरदारी म्हणून पोस्ट ऑफिसची इमारत तात्काळ रिकामी करण्यात आली. 60 कर्मचाऱ्यांना पोस्ट ऑफिसच्या इमारतीतून बाहेर काढण्यात आलं.
हे वाचा - तरुणाच्या चेहऱ्यावर तब्बल 60,000 मधमाश्या; VIDEO पाहून अंगावर येईल काटा
सीएनएनच्या रिपोर्टनुसार, इमारत रिकामी केल्यानंतर पोलिसांनी हे पॅकेट उघडून पाहिलं, तर त्यामध्ये एखादा घातक गॅस नाही तर ड्युरिअन फ्रुट (durian fruit) होते. या पॅकेटमध्ये चार ड्युरियन फ्रुट्स होते जे एका 50 वर्षीय व्यक्तीला त्याच्या मित्राने पाठवले होते.
ड्युरिअन फ्रुट हे दक्षिण पूर्ण आशियात खूप प्रसिद्ध असलेलं फळं. बाहेरून काटेरी आणि विचित्र दिसणारं हे फळं आतून रसाळ असतं, चविष्टही असतं.
हे वाचा - मटकीला मोड आणि आयफोनला तोड नाही, आता गाडीही होणार एका...
मात्र हे फळ सर्वात जास्त प्रसिद्ध आहे ते त्याच्या वासावरून, कारण या फळाला खूप घाण वास येतो. जगातील सर्वात दुर्गंधीयुक्त फळ असं या फळाला म्हटलं तरी हरकत नाही. याचा वास एखाद्या वापरलेल्या मोज्याचा वास कसा येतो, अगदी तसाच येतो असं सांगितलं जातं. त्यामुळे या फळाचा वास कसा असावा याची तुम्हाला कल्पना आलीच असेल आणि याच कारणामुळे अनेक हॉटेल्समध्येही हे फळं वापरलं जात नाही.
संपादन - प्रिया लाड