मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

यापुढे अफगाणिस्तानची परदेशी मदत बंद, उद्ध्वस्त देश उभा करण्याचं तालिबानसमोर आव्हान

यापुढे अफगाणिस्तानची परदेशी मदत बंद, उद्ध्वस्त देश उभा करण्याचं तालिबानसमोर आव्हान

अमेरिकेने (America) अफगाणिस्तानमधून (Afghanistan) माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता तालिबानसमोर (Taliban) उध्वस्त देश उभा करण्याचं बिकट आव्हान असणार आहे.

  • Published by:  desk news

काबुल, 31 ऑगस्ट : अमेरिकेने (America) अफगाणिस्तानमधून (Afghanistan) माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता तालिबानसमोर (Taliban) उध्वस्त देश उभा करण्याचं बिकट आव्हान असणार आहे. तालिबाननं अफगाणिस्तावर 15 दिवसांपूर्वी मिळवलेला पूर्ण ताबा आणि आता अमेरिकेची पूर्ण झालेली एक्झिट प्रक्रिया यानंतर तालिबाननं जंगी सेलिब्रेशन केलं. मात्र अमेरिकेच्या एक्झिटसोबत अफगाणिस्तानला मिळणारी परदेशी मदतदेखील (Foreign Aid) बंद झाली आहे.

नव्या सरकारसमोर आव्हानं

अफगाणिस्तानमध्ये एका महिन्यात नवं काळजीवाहू सरकार अस्तित्वात येईल, अशी माहिती तालिबानच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. मात्र हे सरकार देशाचा आर्थिक कारभार कसा हाकणार, हा मोठा प्रश्न सध्या अफगाणी नागरिकांना पडला आहे. सरकार स्थापन करण्यासाठी, कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी आणि इतर पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी पैसे आणणार कुठून, हा मोठा यक्षप्रश्न सध्या तालिबानला सतावत आहे.

पाकिस्तान धावतोय मदतीला

अफगाणिस्तानमध्ये येऊ घातलेल्या तालिबान सरकारचं पाकिस्तान खुलेआम समर्थन करत असल्याचं चित्र गेल्या काही दिवासांपासून दिसत आहे. पाकिस्तानकडून तालिबान सरकारला आर्थिक रसद पुरवली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. मात्र त्याचवेळी स्वतः पाकिस्तानचेच दिवाळे निघाले असल्यामुळे तिकडून तालिबानला कशी आणि किती मदत होणार, याबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे.

पाकिस्तानचा अति आत्मविश्वास

पाकिस्तानला तालिबान सरकार आल्यामुळे आनंदाच्या उकळ्या फुटत असल्याचं यापूर्वीही दिसून आलं आहे. तालिबान सरकारला पाश्चिमात्य देशांनी मान्यता दिली नाही, तर पुन्हा एकदा 9/11 सारखा हल्ला होऊ शकतो, असा इशारा पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी दिला होता. अर्थात, त्यावर चहूबाजूंनी टीका झाल्यानंतर त्यांनी या विधानावरून घूमजाव केलं होतं.

हे वाचा - तालिबानच्या क्रौर्याची परिसीमा, हेलिकॉप्टरला प्रेत टांगून शहरातून फिरवले

जगाकडून मदतीची अपेक्षा

जगातील सर्व देशांनी तालिबान सरकारला मदत करावी, असं आवाहन तालिबानकडून करण्यात आलं आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे देशाची अर्थव्यवस्था ढेपाळली असून त्यातून सावरण्यासाठी तालिबानने परदेशी मदतीची याचना केली आहे. त्याला जगभरातून कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

First published:

Tags: Afghanistan, America, Taliban