मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

कामाच्या बोजामुळे Amazon च्या कर्मचाऱ्यांना बाटलीत लघुशंका करावी लागते; या नेत्याचा आरोप

कामाच्या बोजामुळे Amazon च्या कर्मचाऱ्यांना बाटलीत लघुशंका करावी लागते; या नेत्याचा आरोप

एका अमेरिकन नेत्याने Amazon कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. कामाच्या प्रचंड बोजामुळे amazon च्या कर्मचाऱ्यांना बाथरुमलाही जाता येत नाही. त्यामुळे त्यांना बाटलीत लघुशंका करावी लागते, असा आरोप संबंधित नेत्याने केला आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 26 मार्च : ई-कॉमर्स क्षेत्रात काम करणाऱ्या Amazon कंपनीने आता आपला आवाका जगभर पसरवला आहे. जगातील लाखो लोक सध्या Amazon कंपनीत नोकरीला आहेत. पण गेल्या काही काळापासून ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांचं शोषण करते, असे आरोप अनेकदा त्यांच्यावर लावण्यात आले आहेत. त्यांना जास्त तास काम करावं लागतं, तसंच कर्मचाऱ्यांची योग्यप्रकारे काळजी घेतली जात नाही, अशा प्रकारचे आरोप त्यांच्यावर केले गेले आहेत. अशातच अमेरिकेच्या एका राजकीय नेत्याने एक ट्वीट करून या वादाला पुन्हा एकदा तोंड फोडलं आहे. संबंधित नेत्याच्या ट्वीटनंतर अनेकांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.

मार्क पोकन नावाच्या अमेरिकन नेत्यानं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, आपल्या कर्मचाऱ्यांना तासाला 15 डॉलर दिले, म्हणजे आपण खूप चांगल्या पद्धतीचं कामाचं वातावरण तयार करतो असं नाही. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांना कामाच्या बोज्यामुळे बाटलीतचं लघूशंका करावी  (employees have to urinate in a bottle) लागते. त्यांच्या या ट्वीटनंतर हा वाद पेटत चालला आहे. तसंच याला Amazon कंपनीनंही प्रत्युत्तर दिलं आहे.

यावर प्रतिक्रिया देताना Amazon न्युजने म्हटलं की, 'तुम्ही बाटलीत लघवी करण्याच्या गोष्टीवर विश्वास नाही करत, बरोबर आहे ना? कारण असं असतं तर जगातील कोणत्याही व्यक्तीनं आमच्यासाठी काम केलं नसतं. आमच्यासोबत सध्या दहा लाखांपेक्षा अधिक लोकं काम करतात, हे तथ्य आहे. ही लोकं आमच्यासोबत अभिमानाने काम करतात. या लोकांना केवळ चांगला पगारच दिला जात नाही, तर कामाच्या पहिल्या दिवसापासूनचं त्यांच्या चांगल्या आरोग्याचीही आम्ही काळजी घेतो.'

Amazon च्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. यामध्ये एका पत्रकाराने पुरावा दाखवून Amazon चं पितळ उघडं पाडलं आहे. तर आणखी एका कामगार पत्रकारानं लिहिलं की, मी Amazon चं चांगल्याप्रकारे वार्तांकन केलं आहे. या कंपनीच्या कामाच्या बोज्याबाबत मी चांगलाचं परिचयाचा आहे. या कंपनीच्या डिलिव्हरी बॉईजला लघवी करण्यासाठीही खूप संघर्ष करावा लागतो.

(वाचा -Amazon वर लागणार 7 दिवसांचा बॅन? ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी)

Amazon कंपनीतील एका डिलिव्हरी बॉयने रॉयटर्सला दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितलं की, 'आम्हाला दिवसाला किमान 300 पार्सल द्यावे लागतात. हे पार्सल द्यायला उशीर झाला, तर नोकरी जाण्याचा धोका असतो. त्यामुळे प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो. अशा अवस्थेत लघुशंका करण्यासाठी बाथरुम शोधत बसलो तर, 15 ते 20 मिनिटं वाया जाण्याची शक्यता असते. त्यामुळे काही वेळा आम्हाला बाटलीत लघुशंका करावी लागते. पण दरम्यान आम्ही स्वच्छतेची पुरेपूर काळजी घेतो, कामकाज उरकल्यानंतर सॅनिटायझरने हात स्वच्छ करतो, असंही त्याने सांगितलं आहे.

First published:

Tags: Amazon, Crime news