Home /News /videsh /

Russia-Ukraine युद्धामुळे मोठे नुकसान, युक्रेनमधील प्राणी संग्रहालयातील 4 हजार प्राण्यांवर उपासमारीची वेळ

Russia-Ukraine युद्धामुळे मोठे नुकसान, युक्रेनमधील प्राणी संग्रहालयातील 4 हजार प्राण्यांवर उपासमारीची वेळ

Kyiv zoo

Kyiv zoo

गेल्या 15 दिवसांपासून रशिया (Russian) युक्रेनवर (Ukraine) सातत्याने हल्ला करत आहे. रशियाच्या क्षेपणास्त्र (Missiles) आणि बॉम्बस्फोटांमुळे युक्रेन उद्ध्वस्त होत आहे. या युद्ध संघर्षात मोठी जीवितहानी झाली. अशा परिस्थितीत युक्रेनमधील सामान्य लोकांसोबतच प्राण्यांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 11 मार्च: गेल्या 15 दिवसांपासून रशिया (Russian) युक्रेनवर (Ukraine) सातत्याने हल्ला करत आहे. रशियाच्या क्षेपणास्त्र (Missiles) आणि बॉम्बस्फोटांमुळे युक्रेन उद्ध्वस्त होत आहे. या युद्ध संघर्षात मोठी जीवितहानी झाली. अशा परिस्थितीत युक्रेनमधील सामान्य लोकांसोबतच प्राण्यांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. युद्धाची स्थिती पाहता, युक्रेनमधील सुमारे 20 लाख लोकांना देश सोडावा लागला. त्याच वेळी, कीवच्या प्राणीसंग्रहालयात (Kyiv zoo) उपस्थित असलेल्या प्राण्यांनाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सतत गोळीबार होत असताना प्राण्यांच्या अन्नाची व्यवस्था करताना अडचणी येत आहेत. तरीही, येथील कर्मचारी त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी गोळा करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. आधीच साठवून ठेवलेले अन्न संपत चालले आहे, अशा स्थितीत हे निष्पाप प्राणी काय खाणार आणि कसे जगणार अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. युद्धामुळे प्राण्यांना अन्न मिळणे कठीण झाले आहे. जनावरांवर ताण येत आहे. बॉम्बस्फोटांमुळे तेही प्रचंड घाबरले आहेत. माहितीनुसार, कीव प्राणीसंग्रहालयात सुमारे 200 प्रजातींचे 4 हजार प्राणी आहेत. गेल्या वर्षी प्राणीसंग्रहालयात 7 लाखांहून अधिक लोक प्राणी पाहण्यासाठी आले होते, मात्र यंदा हे ठिकाण ओसाड झाले आहे. इथे शांतता आहे. रशियन टँक आणि रॉकेटच्या स्फोटांमुळे प्राणी खूपच घाबरले आहेत. जनावरांना शांत करणे कठीण होत आहे. येथील कर्मचारी सांगतात की, युद्धाची परिस्थिती पाहता त्यांच्याकडे २ आठवडे अन्नसाठा होता, तो आता कमी होत आहे. आता प्राण्यांच्या सोबत राहण्याची वेळ आली आहे. प्राण्यांच्या सुरक्षेसाठी मत्स्यालय बनवून तळघराचा वापर बॉम्ब निवारा म्हणून केला जात आहे. जिथे प्राण्यांसोबत प्राणीसंग्रहालयाचे कर्मचारीही त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत आहेत. प्राणीसंग्रहालयात दररोज मानव मोठ्या संख्येने येत असत, त्यामुळे मानव आणि प्राणी समोरासमोर येत असत. मात्र आता बिचारे प्राणी माणसांना दिसत नसल्याने अत्यंत दु:खी जीवन जगू लागले आहेत. त्यामुळे प्राणिसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी आता चित्रपट दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे खरा माणूस समोर येणार नाही, पण निदान कुठेतरी माणसं तरी दिसावीत म्हणून काहीतरी तरी दिसेल. युद्धाच्या पार्श्वभूमीवर प्राणीही कैद झाले आहेत. प्राणीसंग्रहालय बंद आहे. काहीदिवसांपूर्वी, कीवच्या पूर्वेकडील अभयारण्यातून सहा सिंह, सहा वाघ, दोन कॅराकल आणि एक आफ्रिकन जंगली कुत्रा या प्राण्यांना रशियन आक्रमणापासून वाचण्यासाठी पोलंडला ट्रकमधून नेण्यात आले. असे पोलिश प्राणीसंग्रहालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले होते.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Russia Ukraine

    पुढील बातम्या