Home /News /videsh /

अमेरिकेतही शॉर्ट ड्रेसमुळे प्रवासास प्रतिबंध, छोट्या कपड्यांमुळे मॉडेलला विमानात बसण्यास मनाई

अमेरिकेतही शॉर्ट ड्रेसमुळे प्रवासास प्रतिबंध, छोट्या कपड्यांमुळे मॉडेलला विमानात बसण्यास मनाई

बॉडीबिल्डर आणि फिटनेस मॉडेल Deniz Saypinar ला छोट्या कपड्यांमुळे फ्लाईटमध्ये (Flight) बसण्यास नाकारण्यात आल्याचं समोर आलं आहे.

  वॉशिंग्टन, 12 जुलै : महिलांवर अनेकदा त्यांच्या कपड्यांवरुन टीका झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पुन्हा एकदा अशीच बाब समोर आली असून आधुनिक म्हटल्या जाणाऱ्या अमेरिकेतही (America) कपड्यांवरुन एका महिलेला निशाणा करण्यात आलं आहे. बॉडीबिल्डर आणि फिटनेस मॉडेल Deniz Saypinar ला छोट्या कपड्यांमुळे फ्लाईटमध्ये (Flight) बसण्यास नाकारण्यात आल्याचं समोर आलं आहे. छोट्या कपड्यांचं कारण देत, अमेरिकन एअरलाईन्सनच्या (American Airlines) स्टाफने फिटनेस मॉडेल Deniz Saypinar ला फ्लाईटमध्ये चढण्यास रोखलं. डेनिजने हा संपूर्ण प्रकार आपल्या सोशल मीडियावर शेअर करत या घटनेची माहिती दिली आहे. डेली मेलने दिलेल्या रिपोर्टनुसार, तुर्कीची बॉडीबिल्डर आणि फिटनेस मॉडेल डेनिजसोबत अमेरिकेतील टेक्सासमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. तिचे कपडे योग्य नसल्याने एअरलाईन्सनच्या कर्मचाऱ्यांनी तिला विमानात बसण्यास प्रतिबंध केला. मुळची तुर्कीची (Turkey) असणाऱ्या डेनिजने तेथील रुढीवादी विचारांपासून वाचण्यासाठी आपला देश सोडून अमेरिकेत आली होती. परंतु इथेही तिला अशा विचारांचा सामना करावा लागला. कपड्यांच्या आधारे एखाद्याशी भेदभाव कसा केला जाऊ शकतो, असा सवालही तिने केला आहे. सोशल मीडियावर Deniz Saypinar चे फॉलोवर्सही तिला मिळालेल्या या वागणुकीमुळे American Airlines वर निशाणा साधत आहेत.

  (वाचा - तुम्हीही बिअर पिता का? या देशात मानवी मुत्रापासून बनवली जातेय Beer)

  Deniz Saypinar प्रसिद्ध फिटनेस मॉडेल, उद्योजक आहे. ती सोशल मीडियावरही अतिशय प्रसिद्ध आहे. Deniz Saypinar इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डर्सचा दर्जा मिळवणारी तुर्कीतील पहिली महिला होती. दरम्यान, याआधीही अभिनेत्रीला छोट्या कपड्यांमुळे विमानात बसण्यास मनाई करण्यात आल्याचा प्रकार घडला होता.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: America

  पुढील बातम्या