• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • बापरे! किडलेल्या दातांवर महिलेचे घरात अघोरी उपचार; आता हसणंही झालंय बंद

बापरे! किडलेल्या दातांवर महिलेचे घरात अघोरी उपचार; आता हसणंही झालंय बंद

महिलेची भयंकर अवस्था झाली आहे.

 • Share this:
  लंडन, 7 ऑक्टोबर : ब्रिटेनमध्ये (Britain) राहणारी 42 वर्षीय महिलेने घरातच केलेला प्रताप तिच्याच अंगाशी आला आहे. 42 वर्षीय महिलेने खासगी डेंटिस्टकडे (Dentist) जाण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे महिलेने स्वत:चे 11 दात उपटून काढले. महिलेने सांगितलं की, तिच्याच भागातील एका सरकारी रुग्णालयात एकही डेंटिस्ट नव्हता आणि पैसे नसल्यामुळे ती खासगी डॉक्टरकडे जाऊ शकत नव्हती. त्यामुळे तिने एक एक करीत आपले 11 दात उपटून काढले. महिलेने हसणं केलंय बंद ‘मिरर’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, डेनिएल वाट्स (Danielle Watts) हिने गेल्या तीन वर्षात आपले 11 दात उपटून काढले आहेत. तिने सांगितलं की, परिसरात NHS डेंटिस्ट नव्हता आणि खासगी डॉक्टरला देण्यासाठी तिच्याजवळ पैसे नव्हते. त्यामुळे तिला खराब झालेले दात काढावे लागले. डेनिएलच्या तोंडात आता काही दात शिल्लक आहेत, मात्र अनेक दात नसल्यामुळे तिने हसणंही बंद केलं आहे. हे ही वाचा-सेक्स वर्करने लावला 25 कोटींचा चुना; वयस्क व्यक्तीने व्यक्त केला पश्चाताप दररोज घेते Painkillers डेनिएलने सांगितलं की, मी हसणं विसरून गेले आहे. माझा आत्मविश्वासदेखील कमी होत चालला आहे. मला दररोज पेनकिलर घ्यावी लागते.  महिलेच्या घराजवळील NHS सर्विस गेल्या 6 वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे तिला अडचणींचा सामना करावा लागत आहे. मी खूप ठिकाणी चौकशी केली मात्र कोणीही NHS पेशंटवर उपचार करण्यास नकार दिला. अनेकांनी खासगी डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला. Private Dentist खूप महाग महिलेने सांगितलं की, तिला दातांचा त्रास होता. काही दात हलत होते, तर काही किडले होते. हलणारे दात तिने आपल्या हातानेच काढले. ती म्हणते की, हे खूप वेदनादायी होतं. मात्र माझ्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता. लंडनमध्ये खासगी डॉक्टरांचे शुल्क खूप जास्त आहे. आर्थिक अडचण असणाऱ्या कुटुंबाला अशा ठिकाणी उपचार घेणं अशक्य असतं. त्यामुळे लोक सरकारी रुग्णालयात उपचार घेतात.
  Published by:Meenal Gangurde
  First published: