मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

दुबईची राजकुमारी व्हिलामध्ये कैद; व्हिडीओ प्रसारित करून केली मदतीची याचना

दुबईची राजकुमारी व्हिलामध्ये कैद; व्हिडीओ प्रसारित करून केली मदतीची याचना

दुबईच्या (Dubai) बलशाली राज्यकर्त्याच्या मुलीचा एक धक्कादायक व्हिडीओ (Video) समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तिने आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे. तसंच या स्थितीत ती कधीपर्यंत जीवंत राहू शकेल, हे सांगू शकत नाही, असंही तिने या व्हिडीओत म्हटलं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

दुबई, 17 फेब्रुवारी: दुबईच्या बलशाली राज्यकर्त्याच्या मुलीचा एक धक्कादायक व्हिडीओ (Video) समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तिने आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे. तसंच या स्थितीत ती कधीपर्यंत जीवंत राहू शकेल, हे सांगू शकत नाही, असंही तिने या व्हिडीओत म्हटलं आहे. 2018 मध्ये तिने स्वतः च्या देशातून पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. ती समुद्रामार्गे एका बोटीने भारताकडे येत होती. मात्र मध्येच तिला पकडण्यात आलं आणि पुन्हा दुबईला नेण्यात आलं होतं. त्यानंतर मंगळवारी पुन्हा तिचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे.

बीबीसीने प्रसिद्ध केलेल्या या व्हिडीओमध्ये शेख लतीफा बिंत मोहम्मद अल मख्तूमला (seikha latifa bint mohammed Bin Rashid) एका व्हिलामध्ये कैद करून ठेवण्यात आलं आहे. हा व्हिला संभाव्यत: संयुक्त अरब अमिरातीच्या एका शहरात आहे. तिचे वडील शेख मोहम्मद बिन राशिद अल मख्तूम हे संयुक्त अरब अमिरातीचे पंतप्रधान आणि उपराष्ट्रपती म्हणून कार्यरत आहेत. या प्रशासकाच्या मुलीने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे की, 'मला बंधक बनवलं आहे. या व्हिलाचं कारागृहात रूपांतर करण्यात आलं आहे. त्यामुळे ताज्या हवेसाठीही बाहेर जाऊ शकत नाही."

(वाचा - Gorilla Glue मुळे आणखी एकाची झाली भयंकर अवस्था; ग्लूने तोंडाला कप चिकटवला आणि...)

असोसिएट प्रेसने या व्हिडीओबाबत प्रतिक्रिया मागितली असता, सरकारच्या दुबई मीडिया कार्यालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. यापूर्वी संवाद समितीने असोसिएट प्रेसला सांगितलं होतं की, 2018 मध्ये शेख लतीफा तिचा मित्र आणि फ्रान्सचा माजी गुप्तहेरच्या मदतीने बोटीतून पळून गेली होती. मात्र, त्यानंतर त्याला भारताच्या किनाऱ्यापासून काही अंतरावर असताना पकडण्यात आलं होतं.

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, शेख लतीफाने व्हिलामधील एका शौचालयात एका फोनवर हा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. तिला कैद केल्यानंतर साधारणतः एका वर्षानंतर हा व्हिडीओ गुप्त पद्धतीने बाहेर आला आहे. या व्हिडीओमध्ये शेख लतीफा असं म्हणताना दिसत आहे की, 'मला माहित नाही की, मला कधी सोडण्यात येईल आणि मला सोडलं तर माझी काय स्थिती असेल, हेही माहित नाही. मी माझ्या सुरक्षिततेबाबात आणि जीवाबाबत दररोज चिंतीत आहे.' तिच्या या व्हिडीओने आंतराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे.

First published:

Tags: Dubai, International, Rescue operation, Seikha latifa bint mohammed Bin Rashid, Video Viral On Social Media