Home /News /videsh /

'बाळाचा जन्म भारतात व्हावा', दुबईत अडकलेल्या महिलेनं सुप्रीम कोर्टाकडे मागितली मदत

'बाळाचा जन्म भारतात व्हावा', दुबईत अडकलेल्या महिलेनं सुप्रीम कोर्टाकडे मागितली मदत

कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देश-विदेशातील विमानसेवाही बंद कऱण्यात आली आहे.

    दुबई, 23 एप्रिल : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केलं आहे. यामुळे सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणं रोखण्यात आली आहेत. दुबईत एक 27 वर्षांची गर्भवती भारतीय महिला देसात परतण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे मदत मागत आहे. महिलेनं भारतात प्रसूती व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामध्ये महिलेनं म्हटलं की, प्रसुतीसाठी घरी परतायला न्यायालयाने मदत करावी. गल्फ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, मूळची केरळची असलेल्या गीता श्रीधरन यांनी म्हटलं की, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तिला मुल होईल. त्याच्या जन्मासाठी भारतात परतण्याची इच्छा आहे. गीता श्रीधरन या पतीसह दुबईमध्ये राहतात. श्रीधरन यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत मायदेशात परतण्यासाठी मदत मागितली आहे. दरम्यान, जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. कोरोना व्हायरसच्या रुग्णांचे प्रमाण आणि परिस्थिती पाहून लॉकडाऊन वाढवण्याचे निर्णयही घेतले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर देश-विदेशातील विमानसेवाही बंद कऱण्यात आली आहे. हे वाचा : लॉकडाऊनमुळे बायको अडकली माहेरी, नवऱ्याने रागात प्रेयसीशी लग्न करुन थाटला संसार भारतात कोरोनाबाधितांची संख्या 21000 च्या पुढे गेली आहे.तरीही एक समाधानकारक बाब ही की 23 राज्यांच्या 78 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसात एकही नवा कोरोनाबाधित रुग्ण सापडलेला नाही. आतापर्यंत भारतात COVID-19 मुळे 681 लोकांचा मृत्यू झाला आहे. पण 4257 माणसं बरी होऊन कोरोनामुक्त झाली आहेत. ताज्या आकडेवारीनुसार देशात 21393 कोरोनाग्रस्त आहेत. हे वाचा : धक्कादायक! दोन मांजरांना कोरोनाची लागण, रिपोर्ट आले पॉझिटिव्ह संपादन - सूरज यादव
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या