Home /News /videsh /

दुबईस्थित भारतीयानं नोंदवला सर्वाधिक जागतिक विक्रमांचा विक्रम; 6 महिन्यांपासून करीत होता प्रयत्न

दुबईस्थित भारतीयानं नोंदवला सर्वाधिक जागतिक विक्रमांचा विक्रम; 6 महिन्यांपासून करीत होता प्रयत्न

' जुना विक्रम मोडला जावा यासाठी योग्य वेळेच्या शोधात होतो. शेख मोहमद यांच्या सत्तेवर येण्याच्या दिनाचा 15 वा वर्धापनदिन हा अगदी योग्य दिवस होता. '

    दुबई, 5 जानेवारी : दुबईमध्ये (Dubai)अनेक वर्षे स्थायिक असलेले भारतीय रामकुमार सारंगपाणी (Ramkumar Sarangpani) यांनी सर्वाधिक जागतिक विक्रम करण्याचाही (World Records) विक्रम करत, आपलं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness Book of World Records) नोंदवलं आहे. असा विक्रम करणारे ते भारत (India) आणि अरब अमिरातीमधील (UAE) पहिले व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी दुबईचे क्राउन प्रिन्स शेख मोहमद बिन राशिद अल मक्तूम (Shaikh Mohamad  Bin Rashid Al Maktum) यांना सत्तेवर येऊन 15 वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त जगातील सर्वांत लांब ग्रीटिंग कार्ड (Greeting Card) तयार करून गिनीज बुकमध्ये आपला 19 वा जागतिक विक्रम नोंदवला आहे. 8.2 मीटर लांबीचे हे इलेक्ट्रॉनिक पॉप-अप स्वरूपातील ग्रीटिंग कार्ड असून, सारंगपाणी यांनी या आधी हॉंगकॉंगमध्ये बनवण्यात आलेल्या 6.729 चौरस मीटर आकाराच्या सर्वांत लांब ग्रीटिंगचा विक्रम मोडला आहे. सर्वसाधारण ग्रीटिंग कार्डपेक्षा हे शंभर पट अधिक मोठे असून, त्यावर दुबईतील प्रसिद्ध कलाकार अकबर साहेब यांनी बनवलेल्या शेख मोहमद यांच्या अनेक चित्रांचे संकलन आहे. अरब अमिरातीतील राष्ट्रीय दिनानिमित्त आयोजित समारंभादरम्यान, 4 ते 18 जानेवारी दरम्यान, हे ग्रीटिंग दोहा सेंटरमधील प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या अन्य जागतिक विक्रमांमध्ये सर्वांत मोठे डेस्क कॅलेंडर, सर्वांत छोटा पत्त्यांचा कॅट, सर्वांत मोठे बिझनेस कार्ड, सर्वांत लांब मॅग्नेटचे शिल्प आणि इतर अनेक रेकॉर्ड्सचा समावेश आहे. 18 नोव्हेंबर 2020 रोजी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड डे (जीडब्ल्यूआर डे-GWR-Day) दिवशी त्यांनी तब्बल 7 तास 50 मिनिटांत 6 जागतिक विक्रम मोडण्याचाही पराक्रम केला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याच्या नावावर असलेला सर्वाधिक 17 जागतिक विक्रमांचा विक्रमही रामकुमार यांनी 19 जागतिक विक्रम करून मोडला आहे. आयुष्यात 100 जागतिक विक्रम मोडण्याचं त्यांचं स्वप्न आहे. आपल्या या विक्रमाबाबत गल्फ न्यूजशी बोलताना सारंगपाणी म्हणाले, गेले सहा महिने मी हे ग्रीटिंग बनवण्यासाठी काम करत होतो. जुना विक्रम मोडला जावा यासाठी योग्य वेळेच्या शोधात होतो. शेख मोहमद यांच्या सत्तेवर येण्याच्या दिनाचा 15 वा वर्धापनदिन हा अगदी योग्य दिवस होता. दुबईच्या 50व्या स्थापनादिनानिमित्त मी हे ग्रीटिंग दुबईला अर्पण केलं आहे.’ लक्षवेधी आणि भव्य बांधकामांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुबईशी नाळ जोडणाऱ्या ‘सर्वांत मोठ्या’, ‘सर्वांत लांब’ अशा सगळ्या संकल्पनांबद्दल मला आकर्षण वाटतं. दुबईमुळेच हे विक्रम साध्य करण्याची मला प्रेरणा मिळाली आहे. दुबई हे माझं दुसरं घर आहे. दुबईस्थित भारतीय नागरिक म्हणून माझ्या यशामुळे दोन्ही देशांची मान अभिमानाने उंचावण्याचे माझं ध्येय असून, 135 कोटी लोकसंख्येच्या देशात जगभरात सर्वाधिक जागतिक विक्रम करणारा मी पहिला व्यक्ती ठरेन, असा विचार कधीही केला नव्हता, अशी भावना रामकुमार यांनी व्यक्त केली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या