Home /News /videsh /

धक्कादायक! कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्यायले दारू, 44 जणांचा मृत्यू

धक्कादायक! कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्यायले दारू, 44 जणांचा मृत्यू

संपूर्ण जगभरात कोरोनाचा विळखा वाढत आहे, यासाठी नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे

    तेहरान, 11 मार्च : कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) प्रभावित झालेल्या इराणमध्ये (Iran) सर्व कैद्यांना अस्थायी स्वरुपात सोडण्यात आले आहे. तर दुसरीकडे विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या वाढून 44 पर्यंत पोहोचली आहे. दारू प्यायल्याने कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखता येऊ शकतो, अशी अफवा पसरल्याने लोकांनी विषारु दारू प्यायल्याचे इरना न्यूज रिपोर्टमध्ये म्हटले आहे. विषारू दारू प्यायल्याने देशातील अनेकांना याचा त्रास झाला आहे. यामध्ये उपचार करण्यासाठी 270 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे त्यांच्यावर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयाचे प्रवक्ता डॉ. अली इशनपौर यांनी सांगितले. विषारू दारू विक्री केल्याच्या आरोपाखाली देशातील अनेक ठिकाणांहून अटक करण्यात आली आहे. मंगळवारी इराणमध्ये कोरोना व्हायरसमुळे 54 जणांचा मृत्यू झाला असून त्यामुळे आतापर्यंत मृतांचा आकडा 291 पर्य़ंत पोहोचला आहे. पश्चिम आशियात कोरोना व्हायरसमुळे इराण हा सर्वाधिक प्रभावित झालेला देश आहे, अशी माहिती स्वास्थ मंत्रालयाचे प्रवक्ता कियानोउश जहानपोर यांनी दिली. संबंधित - पुण्यात कोरोनाच्या भीतीने तीन शाळांना सुट्टी कर्नाटकात कोरोनाव्हायरसचा जो पहिला रुग्ण आढळून आला, त्याच्या पत्नी आणि मुलीलाही कोरोनाव्हायरस असल्याचं स्पष्ट झालं आहे. याशिवाय आणखी एका व्यक्तीलाही कोरोनाव्हाययरसची लागण झाली आहे. ही व्यक्तीदेखील कर्नाटकातल्या पहिल्या रुग्णाच्या संपर्कात आल्याचं सांगितलं जातं आहे. कर्नाटकात सोमवारी कोरोनाव्हायरसचा पहिला रुग्ण आढळून आला. यूएसहून बंगळुरूत आलेला हा रुग्ण आयटी इंजिनीअर आहे. त्याला कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचं निदान झाल्यानंतर त्याची पत्नी आणि मुलीचीही तपासणी करण्यात आली आणि तेदेखील कोरोनाव्हायरस पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं. संबंधित - कर्नाटक, केरळात 'कोरोना'चे आणखी रुग्ण, भारतात व्हायरसच्या रुग्णांचा आकडा वाढला
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Alcohol drink, Corona virus, Iran

    पुढील बातम्या