Home /News /videsh /

मित्रांसोबत ओली पार्टीची मजा भोवली; बेरोजगार तरुणाला कोर्टाने सुनावला थेट 4 लाखांचा दंड

मित्रांसोबत ओली पार्टीची मजा भोवली; बेरोजगार तरुणाला कोर्टाने सुनावला थेट 4 लाखांचा दंड

या व्यक्तीने असं काही केलं की हे प्रकरण थेट कोर्टात पोहोचलं.

    इंंग्लंड, 19 सप्टेंबर : दारू (Alcohol) माणसाचं आयुष्य उद्धवस्त होतं. दारू पिणाऱ्या व्यक्तीच्या हे (Drunkard) लक्षात येत नाही की, दारू तिला हळूहळू करीत पूर्ण संपवून टाकते. आरोग्याशी संबंधित आजारही सुरू होतात. दारू व्यक्तीला अनेकदा अशा अडचणीत टाकतो की, ज्यातून बाहेर पडणं कठीण होतं. इंग्लंडमध्ये (England) राहणाऱ्या तरुणाने दारूच्या नशेत असं कृत्य केलं की ज्यामुळे त्याला लाखोंचा दंड द्यावा लागला. (Drunk youth fined Rs 4 lakh for Vulgar Activity with street statue) मित्रांसह दारू प्यायला गेली होती व्यक्ती 45 वर्षांचा स्टुअर्ट टॉमलिंसन (Stewart Tomlinson) इंग्लंडमधील नॉर्थ लिंकनशायरचा (North Lincolnshire) रहिवासी आहे. तो दोन मुलांचा बाप आहे, मात्र बेरोजगार आहे. स्टुअर्ट एके दिवशी आपल्या मित्रांसह दारू पिण्यासाठी गेला होता. जेव्हा तेथून परतला तेव्हा त्याच्याही लक्षात आलं नाही की तो काय करीत आहे. तो लिंकन सिटी फुटबॉल क्लब (Lincoln City Football Club) जवळ पोहोचला. तेथे चॅरिटीसाठी एक स्टॅच्यू (Statue) ठेवला होता. स्टुअर्टने नशेच्या अवस्थेत तो स्टॅच्यू तोडला आणि त्याच्यासह अश्लील कृत्य (Vulgar Activity) करण्याचा अभिनय करू लागला. तेथे उभे असलेले मित्रही हसू लागले. स्टुअर्टचं कृत्य तेथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. हे ही वाचा-मालकीणीवरील अत्याचाराचा पोपट ठरला साक्षीदार; कोर्टाला सांगितला घडलेला प्रकार कोर्टाने व्हिडीओ पाहिल्यानंतर सुनावली शिक्षा जेव्हा हे प्रकरण कोर्टात गेलं तेव्हा समोर आलं की, स्टुअर्टने 20 लाख रुपयांहून जास्त नुकसान केलं होतं. कोर्टात त्याने केलेलं कृत्य दाखविण्यात आलं. यातं त्याने केलेलं अश्लील कृत्य स्पष्ट दिसत होतं. स्टूअर्टने कोर्टात सांगितलं की, त्याला स्लिप डिस्कचा त्रास आहे. त्यामुळे त्याला जास्त सामान उचलताना आणि चालता-फिरताना त्रास होतो. मात्र जेव्हा कोर्टाने व्हिडीओ पाहिला तर ते हैराण झाले. हे स्टॅच्यू चॅरिटी जमा करण्यासाठी लावले जातात. यानंतर कोर्टाने त्याला 4 लाखांचा दंड भरण्याचा आदेश दिला.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Alcohol, England

    पुढील बातम्या