विमान 33 हजार फुटांवर असताना तो उघडत होता दरवाजा, इतर प्रवाशांनी काय केलं, पाहा VIDEO

विमान 33 हजार फुटांवर असताना तो उघडत होता दरवाजा, इतर प्रवाशांनी काय केलं, पाहा VIDEO

एक व्यक्ती शौचालयात सिगारेट ओढण्यासाठी गेली होती. या संपूर्ण प्रकरणाची माहिती प्रवाशाने यूट्यूबवर पोस्ट केली आहे.

  • Share this:

फुकेत, 21 ऑक्टोबर : फुकेतला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये एक विचित्र प्रकार घडला आहे. ज्याने फ्लाईटमध्ये असलेले सगळेच जण आश्चर्यचकित झाले. मद्यपान केलेला एक व्यक्ती विमानाचा दरवाजा खोलण्याचा प्रयत्न करत होता. मोठ्या प्रयत्नानंतर त्याला थांबण्यात यश आलं आहे. त्यानंतर दुसऱ्या 2 प्रवाशांनीदेखील मद्यपान केलं होतं. त्यांनी विमानातील प्रवाशांना अगदी हैराण केलं. मिळालेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती शौचालयात सिगारेट ओढण्यासाठी गेली होती.  या संपूर्ण प्रकरणाची माहिती प्रवाशाने यूट्यूबवर पोस्ट केली आहे.

मद्यधुंद प्रवाशाने विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा हे विमान 33 हजार फूट उंचीवर होतं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. इतर प्रवाशांनी मोठ्या प्रयत्नानंतर सगळा प्रकार थांबवला. तोपर्यंत मात्र सगळेजण हैराण झाले होते.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की फ्लाइट कॅप्टनने सीट बेल्ट सिग्नल चालू केला आणि इतर प्रवाशांना सांगितलं की एका प्रवाशाने दारू पिऊन विमानाचा मुख्य दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.

इतर बातम्या - अबब! 21 बाळांची आई आहे ही महिला, आता पुन्हा झाली गरोदर

मेट्रोच्या वृत्तानुसार, फ्लाइटमध्ये उपस्थित असलेल्या एका डॉक्टरने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी, इतर प्रवासी आणि केबिन क्रू यांनी त्याला प्लास्टिकच्या पिशव्यासह सीटवर बांधलं. परंतु तो नियंत्रणात येऊ शकला नाही, त्यानंतर विमानाचे तातडीचे लँडिंग उझबेकिस्तानमध्ये करण्यात आलं. लँडिंगनंतर त्या व्यक्तीस अटक करण्यात आली.

बरं हे प्रकरण येथेच संपले नाही, फ्लाइटमध्ये मद्यपान बॅन असतानाही विमान सुटल्यानंतर आणखी दोन प्रवाश्यांनी मद्यपान करून त्रास देण्यास सुरुवात केली. केबिन क्रूने त्यांनाही रोखण्याचा प्रयत्न केला. काही मिनिटांनंतर एका तिसऱ्या व्यक्तीला विमानाच्या आत शौचालयात सिगारेट ओढताना पकडण्यात आलं. फूकेटमध्ये विमान उतरल्यानंतर थायलंड पोलिसांनी तिघांना अटक केली.

इतर बातम्या - 40 मिनिटं भाषण करता पण मग चक्कर कशी आली, शरद पवारांची पंकजांवर टीका

Published by: Renuka Dhaybar
First published: October 21, 2019, 2:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading