वॉशिंग्टन 15 मे: सर्व जगभर सध्या एकच प्रश्न विचारला जात आहे. आणि तो म्हणजे कोरोनावर औषध केव्हा येणार. जागतिक महासत्ता असलेला अमेरिका यावर औषध शोधण्यासाठी प्रचंड मेहनत घेतो आहे. अमेरिकेने आपले सर्व प्रयत्न या कामासाठी लावले आहेत. कोरोनावर औषध शोधण्याच्या कामासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन खास माणसांची नियुक्ती केली आहे. 2020च्या डिसेंबर पर्यंत किंवा 2021च्या जानेवारी महिन्यात हे औषध तयार होईल असा अंदाज अमेरिकेत व्यक्त होत आहे.
कोरोनावर औषध शोधण्याच्या कामाला गती देण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मॉन्सेफ सॅलावोय आणि आर्मी जनरल गॉस्ताव्ह पेरना यांची नियुक्ती केली आहे. मान्सेफ हे GlaxoSmithKline या कंपनीचे औषध संशोधन निर्मितीचे प्रमुख होते. हे औषध आल्यानंतर लष्कराच्या मदतीने ते औषध शक्य तितक्या कमी वेळेत पूर्ण अमेरिकेत पोहोचविण्याची योजनाही अध्यक्ष ट्रम्प यांनी तयार करायला सांगितली आहे.
कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी जगभरात अनेक देशांनी लॉकडाऊन केलं आहे. यावर उपचारासाठी औषध आणि लस शोधण्याचं काम युद्घ पातळीवर सुरू आहे. यासाठी किमान एक वर्ष लागेल तसंच 20 माणसांवर चाचणी घेतली जाण्याची शक्यता आहे. जगभरात वॅक्सिनची वाट बघितली जात असताना याला विरोध करणारे काही लोक आहेत.
या हॉटेलमध्ये पुतळ्यांनी बुक केल्या खुर्च्या; निम्म्या खुर्च्यांवरच माणसं बसणार
जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी संचालक माइक रेयान यांनी 13 मे रोजी घेतलेल्या पत्रकार परिषेदत सांगितलं की, कोरोनाला रोखण्यासाठी एक प्रभावी लस आवश्यक आहे. मात्र याला विरोध करणाऱ्यांची संख्याही बरीच मोठी आहे.
अमेरिकन वेबसाइट बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार जगातील 10 टक्के लोक वॅक्सिनशिवाय कोरोनाशी लढण्यास तयार आहेत. कोरोनापासून वाचण्यासाठी शरीरात हर्ड इम्युनिटी त्यांना तयार करायची आहे. हर्ड इम्युनिटी तयार होण्यास चार ते पाच वर्षे लागू शकतात. यासाठी मोठ्या संख्येनं कोरोनाबाधित आजुबाजूला असावे लागतात.
वॅक्सिनशिवाय हर्ड इम्युनिटीचा प्रयोग धोकादायक असून त्यामुळे लाखो लोकांचा जीव जावू शकतो. प्रोफेसर एमिली यांनी सांगितलं की, वॅक्सिनची गरज फक्त आतापुरती नाही. जर हा व्हायरस गेला नाही तर पुढच्या पिढ्यांसाठी वॅक्सिनची गरज असेल.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर घेतला निर्णय, चीनच्या शेअर मार्केटमध