Elec-widget

सगळ्यात मोठी चोरी, एका छोट्याश्या बिळातून चोरट्यांनी लंपास केले 7800 कोटींचे दागिने

सगळ्यात मोठी चोरी, एका छोट्याश्या बिळातून चोरट्यांनी लंपास केले 7800 कोटींचे दागिने

जर्मनीच्या ऐतिहासिक ड्रेस्डेन ग्रीन वॉल्ट म्यूझियममधून चोरट्यांनी तब्बल 7800 कोटी रुपयांची ज्वेलरी लंपास केली आहे.

  • Share this:

जर्मन, 26 नोव्हेंबर : चोरीचे अनेक अजब-गजब प्रकार तुम्ही पाहिले असतील. आताही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका चोरांच्या टोळीने जगातली सगळ्यात मोठी आणि महागड्या ठिकाणावरून चोरी केली आहे. जर्मनीच्या ऐतिहासिक ड्रेस्डेन ग्रीन वॉल्ट म्यूझियममधून चोरट्यांनी तब्बल 7800 कोटी रुपयांची ज्वेलरी लंपास केली आहे. चोरीला गेलेले संपूर्ण दागिने हिऱ्यांपासून बनले होते. एकदी एक फुट जागेतून चोर म्यूझियममध्ये शिरले आणि चोरी केली. चोरीच्या या प्रकरणामुळे संपूर्ण जगालाच हादरा बसला आहे. सोमवारी ही घटना घडली आहे.

चोरट्यांनी प्रथम संग्रहालयाच्या अलार्म सिस्टमला आग लावण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांनी खिडकीत फक्त 1 फूटाचं अंतर बनवलं आणि चोरांनी संग्रहालयात प्रवेश केला. हातात टॉर्च घेऊन चोरट्यांनी आत जाऊन लूटमार केली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. परंतु यामध्ये चोरांचे चेहरे दिसत नाहीत.

इतर बातम्या - धावत्या कारमध्ये तरुणीवर केला बलात्कार, रस्त्यात फेकून आरोपी फरार

जर्मनीचे ऐतिहासिक ड्रेस्डेन ग्रीन वॉल्ट संग्रहालय जगातील सर्वात जुन्या संग्रहालमध्ये मोजले जाते. गजर यंत्रणा बिघडल्यामुळे अधिकाऱ्यांना चोरी झाल्याची माहिती उशिरा मिळाली. चोरांनी 18 व्या शतकातील सगळ्यात महागड्या दाग-दागिन्यांचे तीन सेट लुटले. पण खुल्या बाजारात हे दागिने विक्री करणे अशक्य असं जर्मनीतील अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

इतर बातम्या - राजकारणाला नवं वळण, राजकीय सन्यास घेणार का अजित पवार?

Loading...

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, चोरांना काचेचा फक्त एक तुट तोडण्यात यश आलं. हे दागिने डझनभर रत्नांनी बनवले होते. दरम्यान, हे दागिने खूप ऐतिहासिक आहे. ती आपल्या देशाची ओळख आहे. त्यामुळे ते चोरट्यांनी तोडू किंवा वितळवू नये असं आवाहन संग्रहालयाकडून करण्यात आलं आहे. बोस्टनच्या गार्डनर संग्रहालयात सुमारे 30 वर्षांपूर्वी चोरट्यांनी 3580कोटींची माल लुटला होता. असं म्हटलं जात आहे की, यानंतर ही आतापर्यंतची सर्वात मोठी चोरी आहे.

मोठी बातमी - देवेंद्र फडणवीस यांनी दिला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा, राजकारणातली BIG BREAKING

ड्रेस्डेन ग्रीन वॉल्ट संग्रहालयातून पोलिसांनी चोरीचा तपास सुरू केला आहे. चोरट्यांबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. पूर्वी हे संग्रहालय सर्वात सुरक्षित संग्रहालय असल्याचे म्हटले जात होते. यामुळे, चोरांच्या टोळीने गजर यंत्रणेला कसे अपयशी ठरवले, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: germany
First Published: Nov 26, 2019 07:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com