मराठी बातम्या /बातम्या /विदेश /मिळवा तुमचा Dream Job! गादीवर झोपल्या-झोपल्या मिळतील 25 लाख रुपये

मिळवा तुमचा Dream Job! गादीवर झोपल्या-झोपल्या मिळतील 25 लाख रुपये

पैसे कमवण्यासाठी (earn money) प्रत्येकजण काही ना काही प्रयत्न करतोच? इतकं की पैशांसाठी काहींना घर सोडावं लागतं. मात्र, एक असा जॉब आहे ज्यात घरामध्येच आरामात गादीवर (Earn money from working from home) पडल्यापडल्या सुद्धा लाखो रुपये मिळतात.

पैसे कमवण्यासाठी (earn money) प्रत्येकजण काही ना काही प्रयत्न करतोच? इतकं की पैशांसाठी काहींना घर सोडावं लागतं. मात्र, एक असा जॉब आहे ज्यात घरामध्येच आरामात गादीवर (Earn money from working from home) पडल्यापडल्या सुद्धा लाखो रुपये मिळतात.

पैसे कमवण्यासाठी (earn money) प्रत्येकजण काही ना काही प्रयत्न करतोच? इतकं की पैशांसाठी काहींना घर सोडावं लागतं. मात्र, एक असा जॉब आहे ज्यात घरामध्येच आरामात गादीवर (Earn money from working from home) पडल्यापडल्या सुद्धा लाखो रुपये मिळतात.

पुढे वाचा ...

  लंडन, 16 ऑक्टोबर: पैसे कमवण्यासाठी (earn money) प्रत्येकजण काही ना काही प्रयत्न करतोच? इतकं की पैशांसाठी काहींना घर सोडावं लागतं. मात्र, एक असा जॉबआहे ज्यात घरामध्येच आरामात गादीवर (Earn money from working from home) पडल्यापडल्या सुद्धा लाखो रुपये मिळतात. सुरुवातीला तुमचा यावर विश्वास बसणार नाही, पण हो हे खरं आहे. ज्यांना आराम करणं आवडतं, त्यांच्यासाठी एका नोकरीची ऑफर (job offer) आहे. तुम्हाला फक्त तुमच्या घरामध्येच आरामात गादीवर पडल्यापडल्या टीव्हीवर आवडता कार्यक्रम बघायचा आहे. त्या बदल्यात तुमचा पगार तुमच्या खात्यात जमा होणार आहे. हे ऐकायला विचित्र वाटेल, पण ते सत्य आहे. विशेष म्हणजे तुम्ही हे काम घरून करू शकता यासाठी तुम्हाला कोणत्याही ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही.

  ‘द सन' च्या वृत्तानुसार, लक्झरी बेड कंपनी 'क्राफ्टेड बेड्स' ही मॅट्रेस टेस्टरची (Mattress Tester Job) नियुक्ती करत आहे. कंपनीने बनवलेल्या गाद्या कशा आहेत, त्यामध्ये काही सुधारणा करण्याची गरज आहे का, हे सांगण्याचे काम मॅट्रेस टेस्टरचे असणार आहे. या नोकरीसाठी कंपनी वर्षाला 24,000 पौंड म्हणजेच जवळपास 25 लाख रुपये देणार आहे. या काळात तुम्हाला प्रत्येक आठवड्यात उच्च दर्जाच्या गादीची चाचणी घ्यावी लागेल.

  वाचा-Success Story : MBA चं काय जमेना म्हणून चहाचा स्टॉल चालू केला; आता बनलाय करोडपती

  कंपनीला असे वाटते की, त्यांच्या गाद्यांची खरेदी केल्यानंतर ग्राहकाला कोणत्याही प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागू नये. त्यामुळे या गाद्या बाजारात विक्रीसाठी आणण्यापूर्वी त्या आरामदायी आहेत का, याची चाचणी केली जाणार आहे. यासाठी ' मॅट्रेस टेस्टर ' ची नियुक्ती केली जात आहे. या पदावर नियुक्ती झालेल्या व्यक्तीला एका आठवड्यात 37.5 तास गादीवर पडून राहावे लागेल.

  क्राफ्टेड बेड्सचे मार्केटिंग मॅनेजर ब्रायन डिलन म्हणाले, ‘ग्राहकांचे समाधान हे आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. म्हणूनच आम्ही 'मॅट्रेस टेस्टर ' ची नियुक्त करीत आहोत, जेणेकरून गाद्याची गुणवत्ता कळू शकेल.’ डिलन पुढे म्हणाले, ‘या नोकरीसाठी कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येण्याची गरज नाही, ते घरी राहूनच काम करू शकतात. गाद्या त्यांच्या घरी पोहोचवल्या जातील. पण ही नोकरी मिळवण्यासाठी अर्जदाराला काही अटी पूर्ण कराव्या लागतील. त्या म्हणजे अर्जदार हा ब्रिटनचा रहिवासी असणे आवश्यक आहे. तो गादीची चाचणी करण्यास सक्षम असावा. याशिवाय, त्याच्याकडे उत्तम संभाषण कौशल्य असावे, जेणेकरून गादीची चाचणी केल्यानंतर त्याबाबतचा अहवाल तो कंपनीला पाठवू शकेल.’

  वाचा-टॅलेंटच्या शोधात आयटी कंपन्या! 1 लाखांपेक्षा अधिक जणांना देणार नोकऱ्या

  कोरोनाच्या काळात अनेकांना ऑफिस ऐवजी वर्क फ्रॉम होम करावे लागत आहे. त्यासाठी अनेकांनी आपल्या ऑफिसमधील कॉम्प्युटर, लॅपटॉप घरी आणले आहेत. तासनंतास या कॉम्प्युटर, लॅपटॉप समोर काम सुरू असते. मात्र, घरी निवांत गादीवर आरामात पडल्यापडल्या लाखो रुपये कमवण्याची संधी मॅट्रेस टेस्टर या जॉबमुळे मिळणार आहे.

  First published:

  Tags: Job