S M L

अमेरिका आणि चीनचं व्यापार युद्ध, ड्रॅगनवर लादले ६0 अब्ज डॉलरचे शुल्क

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी आयातीविरुद्ध तब्बल ६0 अब्ज डॉलरचे शुल्क लावले आहे. या निर्णयाचे व्हाइट हाऊसने जोरदार समर्थन केले आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Mar 24, 2018 11:32 AM IST

अमेरिका आणि चीनचं व्यापार युद्ध, ड्रॅगनवर लादले ६0 अब्ज डॉलरचे शुल्क

24 मार्च : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी आयातीविरुद्ध तब्बल ६0 अब्ज डॉलरचे शुल्क लावले आहे. या निर्णयाचे व्हाइट हाऊसने जोरदार समर्थन केले आहे. चीनसोबतच्या व्यापारी तुटीमुळे अमेरिकेला २ दशलक्ष रोजगार गमवावे लागले आहेत, अशी माहिती व्हाइट हाऊसने दिली आहे.

चीनने बेकायदेशीर मार्गांनी अमेरिकी बौद्धिक संपदा हस्तगत केल्याचा आरोप करून ट्रम्प यांनी चीनमधून होणाऱ्या आयातीवर हे शुल्क लावले आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे दोन्ही देशांत व्यापार युद्ध भडकण्याची चिन्हे आहेत.

चीनमधून येणा या वस्तूंवर ६0 अब्ज डॉलरचे शुल्क लावण्याचे निर्देश व्यापार मंत्रालयाला ट्रम्प यांनी दिले आहेत. अमेरिकी बौद्धिक संपदेची चीनकडून होत असलेल्या चोरीबाबत चौकशीनंतर आलेल्या अहवालाच्या आधारे हे शुल्क लावण्यात आले. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 24, 2018 11:32 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close