Home /News /videsh /

जुगार खेळण्याच्या आरोपात गाढवाला केलं अटक; 4 दिवस खावी लागली जेलची हवा

जुगार खेळण्याच्या आरोपात गाढवाला केलं अटक; 4 दिवस खावी लागली जेलची हवा

जुगारासाठी गाढवालाच पोलिसांनी तुरुंगात बंद केल्याने पाकिस्तानातील पोलिसांची जगभरात खिल्ली उडवली जात आहे

    इस्लामाबाद, 13 जून : जुगार खेळण्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या गाढवाला पाकिस्तानच्या एका कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. आरोपी गाढवाला चार दिवस पोलीस कोठडीत ठेवल्यानंतर आता कोर्टाच्या निर्देशानुसार बुधवारी त्याची सुटका करण्यात आली. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रहिम यार खान भागात शनिवारी पोलिसांनी एका गाढवाला अटक केली होती. पोलिसांच्या या ‘कामगिरी’वर लोक फिरकी घेत आहेत. या प्रकरणात 8 आरोपींना एका दिवसा नंतर जामीन मंजूर झाला. पण कोर्टाच्या हस्तक्षेपावरुन गाढवाला 4 दिवसानंतर सोडण्यात आले. या लोकांनी सट्टा लावला होता की, गाढव 40 सेकंदात 600 मीटर धावू शकतो का? गाढवाला अटक केल्याची बातमीने जगभरात पसरली आहे. मालक गुलाम मुस्तफा यांच्याकडे गाढव सोपवण्याचे निर्देश पोलिसांनी दावा केला की, त्यांनी गाढव केवळ चार दिवसांसाठी बंद केला होता. कोर्टाने पोलिसांना गाढवाचे मालक गुलाम मुस्तफा यांच्याकडे देण्याचे निर्देश दिले आहे. पाकिस्तानात अनेकदा लोक जुगार खेळतात पण गाढवाला ताब्यात घेतल्यामुळे हे प्रकरण चर्चेत आलं आहे. रहीम यार खान परिसरातील एसएचओने सांगितले की, इतर संशयितांसह गाढवाचे नावही एफआयआरमध्ये नोंदविण्यात आले आहे. या कारणास्तव आरोपी गाढव पोलीस स्टेशनच्या बाहेर बांधले गेले. संशयित जुगारांकडून पोलिसांनी एक लाख 20 हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. ते म्हणाले की, हे जुगारी गाढवाच्या शर्यतीत पैसे लावत होते. पोलिसांनी उचललेलं हे पाऊल केवळ परिसरातच नव्हे तर सोशल मीडियामध्येही चर्चेचा विषय बनला आहे. हे वाचा-चांगली बातमी! महाराष्ट्रात आता कोरोना चाचणीचे दर सर्वात कमी
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या